Chess Record : सिंगापूरच्या ८ वर्षीय मुलाने पोलिश ग्रँडमास्टरवर केली मात

अश्वथ कौशिक या भारतीय वंशाच्या मुलाने ८व्या वर्षीच ग्रँडमास्टरचा पराभव केला आहे. 

89
Chess Record : सिंगापूरच्या ८ वर्षीय मुलाने पोलिश ग्रँडमास्टरवर केली मात
  • ऋजुता लुकतुके

स्वीत्झर्लंड इथं सुरू असलेल्या बर्फडॉर्फर स्टाडहाऊस बुद्धिबळ स्पर्धेत पोलिश ग्रँडमास्टर जेनेक स्टोपाला पराभवाचा धक्का बसला तो एका ८ वर्षीय मुलाकडून. सिंगापूरकडून खेळणारा ८ वर्षीय अश्वथ कौशिक (Ashwath Kaushik) हा भारतीय वंशाचा मुलगा आहे. खेळाच्या पारंपरिक क्लासिकल प्रकारात ग्रँडमास्टर खेळाडूला हरवणारा अश्वथ हा वयाने सगळ्यात लहान खेळाडू ठरलाय. (Chess Record)

अश्वथ ८ वर्षांचा तर त्याची प्रतिस्पर्धी स्टोपा हा ३७ वर्षांचा म्हणजे अश्वथपेक्षा पाचपट जास्त मोठा होता. काहीच महिन्यांपूर्वी सर्बियाच्या लिओनिड इव्हानोविकने बेलग्रेड ओपन स्पर्धेत ६० वर्षीय बल्गेरियन ग्रँडमास्टर मिल्को पोपचेव्हला हरवलं होतं. लिओलिड हा अश्वथपेक्षा (Ashwath Kaushik) काहीच महिन्यांनी मोठा आहे. (Chess Record)

अश्वथ कौशिकचं (Ashwath Kaushik) कुटुंब २०१७ मध्ये सिंगापूरला स्थलांतरित झालं. सध्या फिडेच्या जागतिक क्रमवारीत अश्वथ ३७,३३८ व्या क्रमांकावर आहे. (Chess Record)

(हेही वाचा – Pharma Companies in Hyderabad : हैद्राबादमधील फार्मा कंपन्यांचा पर्यावरणावर होतोय विपरित परिणाम)

अश्वथने (Ashwath Kaushik) २०२२ मध्येच आपल्या कामगिरीने जागतिक स्तरावर पहिल्यांदा आपली चुणूक दाखवून दिली होती. तेव्हा त्याने ८ वर्षांखालील गटात पूर्व आशियाई स्तरावरील अजिंक्यपद स्पर्धेत क्लासिक, रॅपिड आणि ब्लिट्झ अशा तीनही प्रकारात विजेतेपद पटकावलं होतं. अश्वथला (Ashwath Kaushik) त्याचे वडील श्रीराम कौशिक यांचं मार्गदर्शन लाभलं आहे. आपल्या मुलाने ग्रँडमास्टर खेळाडूला हरवल्यानंतर श्रीराम यांनी ट्विटरवर एक पोस्ट लिहून अश्वथच्या सर्व प्रशिक्षकांचे आभार मानले आहेत. (Chess Record)

सातत्यपूर्ण सराव आणि कोडी सोडवण्याचा सराव याचाही उपयोग अश्वथला झाल्याचं वडील श्रीराम यांनी म्हटलं आहे. अश्वथचं पुढील ध्येय क्रमवारीत सुधारणा आणि कँडिडेट मास्टर्स स्पर्धा हे आहे. (Chess Record)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.