Bob Cowper : आंतरराष्ट्रीय सामन्यात पहिलं त्रिशतक ठोकणारे दिग्गज क्रिकेटर कालवश

आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याच्या इतिहासातील पहिले त्रिशतक ऑस्ट्रेलियन दिग्गज क्रिकेटर बॉब काऊपर(Bob Cowper) यांचं निधन झालं. ऑस्ट्रेलियाचे माजी कसोटी फलंदाज बॉब काऊपर यांचं वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले असून त्यांची कर्करोगाशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली.

88

Bob Cowper : आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याच्या इतिहासातील पहिले त्रिशतक ऑस्ट्रेलियन दिग्गज क्रिकेटर बॉब काऊपर(Bob Cowper) यांचं निधन झालं. ऑस्ट्रेलियाचे माजी कसोटी फलंदाज बॉब काऊपर यांचं वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले असून त्यांची कर्करोगाशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली.

बॉब काऊपर यांनी २७ कसोटी सामने खेळले असून ४६.८४च्या सरासरीने २.०६१ धावा केल्या. विशेष म्हणजे काऊपर यांनी १९६६ इंग्लंडविरुध्दच्या सामन्यात ३०७ धावा केल्या होत्या. या धावा आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतिहासातील पहिली वैयक्तिक सर्वाधिक मोठी खेळी म्हणून गणली जाते. देशांतर्गत क्रिकेटमध्ये व्हिक्टोरियाकडून खेळताना बॉब काऊपर यांनी १४६७ सामने खेळले आहेत.

(हेही वाचा broccoli benefits : ब्रोकोली खाओ, खुद जान जाओ; ऍसिडिटी, ब्लड शुगर अशा अनेक समस्यांवर प्रभावी आहे ब्रोकोली… )

आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळताना बॉब काऊपर यांनी अनेक विक्रम प्रस्थापित केले असून देशांतर्गत क्रिकेटमध्ये १४७ सामन्यात १०,५९५ धावा ठोकल्या तर १८३ विकेट्स देखील घेतल्या होत्या. ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटर डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्वाधिक सरासरीने धावा कुटणारे दुसरे फलंदाज होते.

महत्त्वाचे म्हणजे काउपर यांनी १९६८ मध्ये क्रिकेटला रामराम ठोकला होता. त्यावेळी त्यांचं वय अवघं २७ वर्ष होतं. क्रिकेट सोडल्यानंतर त्यांनी बिझनेसवर फोकस फोकस करण्यासाठीच त्यांनी क्रिकेट सोडलं होतं. बिझनेसमध्येही यशस्वी ठरल्यानंतरही काऊपर यांनी क्रिकेट रेफरी म्हणूनही काम केले आहे. Bob Cowper

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.