Bengaluru Stampede : चिन्नास्वामी मैदानावरील चेंगराचेंगरी बंगळुरूला पडली महागात; बीसीसीआयने सामने हलवले

Bengaluru Stampede : आयपीएल नंतरच्या विजयोत्सवात चेंगराचेंगरी होऊन ११ जणांचा मृत्यू ओढवला होता. 

65
BCCI After Bengaluru Stampede : विजयोत्सवासाठीचे नियम करणार कडक; बीसीसीआयचा विचार सुरू
  • ऋजुता लुकतुके

बंगळुरूतील चिन्नास्वामी मैदानावर गेल्या बुधवारी झालेल्या चेंगराचेंगरीनंतर बीसीसीआयने या मैदानावर या हंगामात होणारे सामने दुसरीकडे हलवले आहेत. कर्नाटक क्रिकेट असोसिएशनने गर्दीचं व्यवस्थापन बरोबर केलं नाही, असा ठपका बीसीसीआयने त्यांच्यावर ठेवला आहे. नोव्हेंबरच्या १३ ते १९ तारखांना होणारी आफ्रिकन ए संघाबरोबरची एकदिवसीय मालिका आता राजकोटला हलवण्यात आली आहे. (Bengaluru Stampede)

बीसीसीआयने या आशयाचं पत्रक जारी करताना त्यात कारण दिलेलं नाही. फक्त हे सामने राजकोटला हलवल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर कर्नाटक असोसिएशनने चेंगरा चेंगरी आणि या घटनेचा संबंध नसल्याचं म्हटलं आहे. कर्नाटक असोसिएशनला मंगळवारी आयोजनाची संधी हातातून गेल्याचं समजलं. भारत आणि आफ्रिकेचे ए संघ एकदिवसीय मालिकेपूर्वी अनधिकृत कसोटी सामनेही खेळणार आहेत. हे सामने आता बीसीसीआयच्या क्रिकेट एक्सेलन्स केंद्रातील मैदान आणि बंगळुरू विमानतळाजवळ असलेल्या मैदानावर खेळवले जाणार आहेत. (Bengaluru Stampede)

(हेही वाचा – World Test Championship : कसोटी अजिंक्यपद अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाचं पारडं जड?)

बीसीसीआय बरोबरच आयसीसीनेही झालेल्या घटनेची नोंद घेतली आहे. महिलांच्या विश्वचषकातील सामनेही इथून हलवण्यावर विचार सुरू आहे. सप्टेंबर महिन्यात महिलांचा विश्वचषक सुरू होणार आहे. या स्पर्धेत ३ महत्त्वाचे सामने चिन्नास्वामी मैदानावर होणार आहेत. भारताचा पहिला साखळी सामना, एक उपान्त्य लढत आणि अंतिम फेरीही याच मैदानावर प्रस्तावित आहे. पाकिस्तानचा संघ अंतिम फेरीत पोहोचला तर मात्र सामने कोलंबोला हलवले जातील. (Bengaluru Stampede)

कर्नाटक क्रिकेट असोसिएशनला नजीकच्या काळात क्रिकेट सामन्याचं आयोजन करता येण्याची शक्यता खूपच कमी आहे. एकतर मागच्या बुधवारी झालेल्या प्रकारात स्टेडिअमचीही काही प्रमाणात नासधूस झाली आहे. भिंती, जिने, स्वच्छता गृह तसंच रेलिंगची तातडीने डागडुजी आवश्यक आहे. तसंच एकूणच स्टेडअमचं नुतनीकरण करावं लागणार आहे. शिवाय कर्नाटक सरकार आणि कर्नाटक क्रिकेट असोसिएशन यांच्यावर गर्दी नीट न हाताळल्याचा ठपका बसला आहे. (Bengaluru Stampede)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.