केविन डी ब्रुयेनेच्या गोल्डन गोलच्या जोरावर २०२६ फिफा फुटबॉल विश्वचषकच्या पात्रता फेरीच्या सामन्यात बेल्जियमने वेल्सचा ४-३ पराभव केला. सामना संपायला केवळ दोन मिनिट शिल्लक असताना केविनने गोल करत आपल्या संघाला विजय साकारुन दिला. या असामान्य कामगिरीमुळे केविन आपल्या संघासाठी तारणहार ठरला. (Football World Cup)
(हेही वाचा – Rafael Nadal च्या २०१७ फ्रेंच ओपन फायनलच्या रॅकेटला विक्रमी किंमत)
बेल्जियमचा संघ मध्यंतरापूर्वी ३-० ने आघाडीवर होता. मध्यंतरापूर्वी आघाडी घेतल्याने बेल्जियम या सामन्यात अगदी सहज बाजी मारेल अशी आशा फुटबॉल चाहत्यांना होती. मात्र, वेल्सने सामन्यात झोकात पुनरागमन केले आणि सामना ३-३ ने बरोबरीत आणून ठेवला. बेल्जियमकडून १५ व्या मिनिटाला रोमेलू लुकाकूने, १९ व्या मिनिटाला युरी टिलेमान्स आणि २७ व्या मिनिटीला जेरेमी डोकूने गोल झळकावत आपल्या संघाला या सामन्यावर पकड मजबूत करण्यास हातभार लावला. (Football World Cup)
(हेही वाचा – Mumbai Airport Smuggling Case : वन्यजीव तस्करीचा भांडाफोड; बँकॉकहून परतणाऱ्या व्यक्तीच्या बॅगेत आढळले ‘हे’ दुर्मिळ प्राणी )
सामन्याच्या मध्यंतरानंतर वेल्सने आपला खेळ अधिक आक्रमक केला. त्यांनी बेल्जियमचा बचाव भेदत ४५, ५१ आणि ६९ व्या मिनिटाला चेडू गोल जाळ्यात धाडत सामना आपल्या बाजूने झुकवला. मात्र, सामना संपायला केवळ दोन मिनिटे बाकी असताना बेल्जियमच्या केविन डी ब्रुयनने गोल करत आपल्या संघाचा विजय निश्चित केला. (Football World Cup)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community