BCCI Central Contracts : श्रेयस, इशानला अपेक्षेप्रमाणे बीसीसीआयचं करारपत्र नाही

बीसीसीआयच्या ए प्लस श्रेणीत रोहित, विराट, जसप्रीत आणि जडेजा यांचा समावेश आहे. 

153
BCCI Central Contracts : श्रेयस, इशानला अपेक्षेप्रमाणे बीसीसीआयचं करारपत्र नाही
  • ऋजुता लुकतुके

२०२३-२४ च्या क्रिकेट हंगामासाठी मध्यवर्ती करारासाठी खेळाडूंची यादी बीसीसीआयने (BCCI) जाहीर केली आहे. पण, यात अपेक्षेप्रमाणे इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांची नावं वगळण्यात आली आहेत. दोघांना प्रथमश्रेणी सामने खेळण्याचे निर्देश दिलेले असतानाही त्यांनी रणजीला दांडी मारली होती. इशान किशन डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून मानसिक थकव्याचं कारण देत इशान मधूनच परतला होता. त्यानंतर अलीकडेच तो हार्दिक पांड्याबरोबर बडोद्यात सराव करताना दिसला होता. म्हणजे तो मुंबई इंडियन्सकडून आयपीएलची तयारी तो करत होता. पण, बीसीसीआयने (BCCI) सांगितल्याप्रमाणे झारखंडकडून रणजी सामने तो खेळला नाही.

(हेही वाचा – UPI Payment : आता नेपाळमध्येही करा यू.पी.आय. पेमेंट)

तर श्रेयस अय्यरही मुंबई संघाकडून शेवटचा साखळी सामना आणि त्यानंतर उपउपांत्य फेरीचा सामनाही खेळला नाही. पाठदुखी जाणवत असल्याची तक्रार त्याने केली होती. पण, त्याच्यावर आयपीएलसाठी तंदुरुस्त राहण्यासाठी रणजी सामन्याचा धोका त्याला पत्करायचा नव्हता असा संशय व्यक्त केला जात होता. या दोघांच्या उदाहरणांनंतर बीसीसीआयचे (BCCI) सचिव जय शाह, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांनीही देशांतर्गत क्रिकेटला महत्त्व देण्याचा इशारा खेळाडूंना दिला आहे. आता करारातून वगळून बीसीसीआयने (BCCI) आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

या दोघांचा अपवाद सोडला तर बाकीच्या खेळाडूंनी अपेक्षेप्रमाणे आपले करार राखले आहेत. आणि यशस्वी, जुरेल, आकाशदीप, सर्फराझ यांना नवीन करारही मिळाले आहेत.

(हेही वाचा – Afghanistan : अफगाणिस्तानचा व्यापार आता इराणमधील बंदरांतून; पाकिस्तानला झटका)

२०२३-२४ हंगामासाठीचे करार,

ए प्लस श्रेणी – रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमरा, रवींद्र जडेजा.

ए श्रेणी – आर अश्विन, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, शुभमन गिल, के एल राहुल, हार्दिक पांड्या.

बी श्रेणी – सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, कुलदीप यादव, यशस्वी जयस्वाल, अक्षर पटेल.

सी श्रेणी – रिंकू सिंग, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, शार्दूल ठाकूर, शिवम दुबे, रवी बिश्नोई, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, कोना भरत, प्रसिध कृष्णन, आवेश खान, रजत पाटिदार.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.