Batsman Using Phone : इंग्लिश काऊंटी स्पर्धेत फलंदाजाच्या खिशातून मोबाईल फोन पडल्यामुळे खळबळ

Batsman Using Phone : मैदानावर फोन बाळगण्याविषयीच्या नियमांवर त्यामुळे चर्चा होतेय.

43
Batsman Using Phone : इंग्लिश काऊंटी स्पर्धेत फलंदाजाच्या खिशातून मोबाईल फोन पडल्यामुळे खळबळ
  • ऋजुता लुकतुके

इंग्लिश काऊंटी क्रिकेटमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. लँकेशायर विरुद्ध ग्लूसेस्टरशायर सामन्यांत टॉम बेली फलंदाजीसाठी बाहेर आला. लँकेशायरचे तळाचे फलंदाज मैदानात होते. दोन धावा धावत असताना अचानक बेलीचा मोबाईल फोन त्याच्या खिशातून बाहेर खेळपट्टीवर पडला. टीव्ही कॅमेरांनी ही गोष्ट टिपल्यावर जगभरात त्याची चर्चा सुरू झाली आहे. फलंदाजाने खेळताना मोबाईल बरोबर का बाळगला, तसं करण्याची परवानगी काऊंटी क्रिकेटमध्ये आहे का, असे प्रश्न इंटरनेटवरही थैमान घालत आहेत. (Batsman Using Phone)

लँकेशायरची अवस्था तेव्हा ८ बाद ४०१ अशी मजबूत होती. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी बेली फलंदाजीला आला. प्रामुख्याने गोलंदाज असलेल्या बेलीने ३२ चेंडूंत नाबाद २१ धावाही केल्या. पण, या घटनेमुळे वेगळ्याच गोष्टीसाठी त्याची चर्चा होत आहे. (Batsman Using Phone)

(हेही वाचा – Pahalgam Terror Attack : तुर्कस्तानवर आर्थिक बहिष्कार घाला; ब्रिगेडियर (निवृत्त) हेमंत महाजन यांचे कळकळीचे आवाहन)

‘हे अवैध नाही का? नक्कीच अवैध आहे,’

‘त्याला फोन बाळगायला परवानगी तरी कशी मिळाली?’

‘त्याच्यावर नक्कीच कारवाई व्हायला हवी,’

अशा प्रतिक्रिया जगभरातून इंटरनेटवर येत आहेत. तर इंग्लंडचे माजी कसोटीपटू ॲलेक्स ट्यूडर यांनीही हा व्हिडिओ शेअर करताना आपली नाराजी व्यक्त केली आहे. (Batsman Using Phone)

(हेही वाचा – IPL 2025, Virat Kohli : आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या नावावर अभूतपूर्व विक्रम)

खरंतर फोन पडल्याचं बेलीच्या लक्षातही नाही आलं. प्रतिस्पर्धी गोलंदाजाने ही गोष्ट त्याला ध्यानात आणून दिली. पण, त्यानंतर फोन बेलीला परत मिळाला की, तो पंचांनी जप्त केला हो समजू शकलं नाही. इंटरनेटवर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मात्र इंग्लिश क्रिकेट बोर्डानेही त्याची दखल घेतली आहे. बेलीची या प्रकरणी चौकशी होणार आहे. आयसीसीच्या स्पर्धांमध्ये खेळाडूने क्रिकेट साहित्याव्यतिरिक्त इतर कुठलीही वस्तू स्वत:जवळ बाळगणं हा गुन्हा आहे. रुमाल किंवा खेळासाठी पूरक अशा काही गोष्टी फक्त खेळाडू बरोबर बाळगू शकतात. (Batsman Using Phone)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.