
ऋजुता लुकतुके
१८ वर्षांची आयपीएल विजेतेपदाची प्रतीक्षा संपली म्हणून खुश असलेल्या बंगळुरू (Bangalore Stampede) फ्रँचाईजीने बंगळुरूमध्ये चिन्नास्वामी मैदानात आनंदोत्सव आयोजित केला खरा. पण, त्याला मोठं गालबोट लागलं ते चेंगराचेंगरीचं. सोहळ्यासाठी मैदानात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या ११ चाहत्यांना आपला जीव गमावावा लागला. मैदानाची क्षमता ३३,००० असताना जवळ जवळ एक लाख पाठिराखे मैदानाबाहेर जमले होते. आणि परिणामी, गेट क्रमांक ११, १२ आणि १३ वर चेंगरा चेंगरी होऊन हा प्रकार घडला. (Bangalore Stampede)
It’s a Sad day for Cricket! My heart goes out to the families of those who lost their lives while celebrating RCB’s victory today. Praying for the speedy recovery of those injured. Tragic !! 💔💔
— Anil Kumble (@anilkumble1074) June 4, 2025
भारताचे माजी क्रिकेटपटू आणि दिग्गज खेळाडूंनी या दुर्घटनेबद्दल सोशल मीडियावर दु:ख व्यक्त केलं आहे. बंगळुरू फ्रँचाईजीनेही आपलं अधिकृत निवेदन जारी करताना मृतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तर त्यांच्या कुटुंबीयांना तातडीने प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. बंगळुरू फ्रँचाईजीचा दुसरा कर्णधार अनिल कुंबळेनं ‘क्रिकेटमधील हा सगळ्यात दु:खी दिवस,’ असल्याचं म्हटलं आहे. (Bangalore Stampede)
What happened at Chinnaswamy Stadium, Bengaluru, is beyond tragic. My heart goes out to every affected family. Wishing peace and strength to all. 🙏
— Sachin Tendulkar (@sachin_rt) June 4, 2025
My thoughts and prayers are with all those affected by the tragic events at the Chinnaswamy stadium today. https://t.co/klmCQrjn6k
— AB de Villiers (@ABdeVilliers17) June 4, 2025
What was meant to be a moment of celebration turned into an unimaginable tragedy. My heart goes out to everyone affected by the incident in #Bengaluru.
May the families find strength and the departed souls rest in peace 🙏🏻
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) June 4, 2025
Fans are the heart of cricket and of our lives. The tragic loss of lives in today’s stampede in Bengaluru is deeply heartbreaking. My thoughts and heartfelt condolences are with the families affected by this unimaginable tragedy.
— Irfan Pathan (@IrfanPathan) June 4, 2025
The joy turns into a tragedy. 💔
The unprecedented celebration of the #RCB fans eventually turned into a disastrous chapter in India’s cricketing history.
Outside #chinnaswamystadium , 11 lives lost, 20+ injured in a stampede.
May the Almighty give the strength to their… pic.twitter.com/G108f1o4og— MANOJ TIWARY (@tiwarymanoj) June 4, 2025
गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. पण, त्यानेही परिस्थिती निवळली नाही. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी दिले आहेत. (Bangalore Stampede)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community