Australian Open 2026 : यानिक सिनरचा ५ सेटमध्ये पराभव करत जोकोविच अंतिम फेरीत, २५ व्या विजेतेपदाची प्रतीक्षा

75
Australian Open 2026 : यानिक सिनरचा ५ सेटमध्ये पराभव करत जोकोविच अंतिम फेरीत, २५ व्या विजेतेपदाची प्रतीक्षा
Australian Open 2026 : यानिक सिनरचा ५ सेटमध्ये पराभव करत जोकोविच अंतिम फेरीत, २५ व्या विजेतेपदाची प्रतीक्षा
  • ऋजुता लुकतुके

ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा(Australian Open 2026)ही नोवाक जोकोविचची सगळ्यात लाडकी स्पर्धा आहे. इथे त्याने तब्बल १० वेळा विजेतेपद पटकावलं आहे. आणि आता तो चक्क अकराव्या विदेतेपदासाठी सज्ज झाला आहे. आणि ते ही ३८ व्या वर्षी. त्यासाठी उपान्त्य फेरीच्या सामन्यात त्याने इटलीच्या यानिक सिनरला ५ सेटमध्ये ३-६, ६-४, ४-६, ६-४ आणि ६-४ असं हरवलं. या स्पर्धेची अंतिम फेरी खेळणारा तो वयाने सगळ्यात मोठा व्यावसायिक टेनिसपटू असेल. तर रविवारी तो कोर्टवर उतरले आपलं २५ वं ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावण्याच्या जिद्दीने.(Australian Open 2026)

जोकोविचने तब्बल ४ तास ९ मिनिटे चाललेल्या थरारक सामन्यात पिछाडीवरून बाजी मारली. आता रविवारी त्याच्यासमोर कार्लोस अल्काराझ याचे आव्हान असेल.(Australian Open 2026)

३८ वर्षीय जोकोविचसाठी हा सामना केवळ विजय नव्हता, तर एका काळातील सलग पाच पराभवांची मालिका तोडणारा क्षण ठरला. यासह तो ११व्या ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपदासाठी आणि २५व्या ग्रँडस्लॅम किताबासाठी खेळणार आहे. विशेष म्हणजे, जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत आजवर १० पैकी १० सामने जिंकलेला आहे.(Australian Open 2026)

(हेही वाचा – अजितदादांच्या एक्झिटनंतर राष्ट्रवादीत ‘पॉवर गेम’! विलीनीकरणाच्या भीतीनेच Sunetra Pawar यांचा तातडीने शपथविधी? )

सिनर या सामन्यात १९ सलग ऑस्ट्रेलियन ओपन विजय, २० सलग टूर विजय आणि सलग पाच ग्रँडस्लॅम अंतिम फेरींचा अनुभव घेऊन उतरला होता. मात्र निर्णायक क्षणी जोकोविचचा अनुभव आणि मानसिक ताकद भारी पडली.(Australian Open 2026)

सामन्यानंतर जोकोविच म्हणाला, “आजचा विजय म्हणजे जणू खिताब जिंकल्यासारखेच वाटते. पण आता मला जगातील क्रमांक एक खेळाडूविरुद्ध खेळायचे आहे. माझ्यात तेवढी ऊर्जा राहो, हीच इच्छा आहे.”(Australian Open 2026)

अंतिम फेरीतील प्रतिस्पर्धी कार्लोस अल्काराझ देखील इतिहास रचण्याच्या तयारीत आहे. २२व्या वर्षी करिअर ग्रँडस्लॅम पूर्ण करणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरू शकतो. जोकोविच आणि अल्काराझ यांच्यातील हेड-टू-हेडमध्ये जोकोविच ५-४ ने आघाडीवर आहे, मात्र गेल्या यूएस ओपन उपांत्य फेरीत अल्काराझने सरळ सेटमध्ये विजय मिळवला होता.(Australian Open 2026)

सिनरविरुद्ध पाचव्या सेटमध्ये जोकोविचने सलग १० ब्रेक पॉइंट्स वाचवून सामना आपल्या बाजूने वळवला. निर्णायक क्षणी सिनरचा बॅकहँड बाहेर गेल्यावर जोकोविचने सामना संपवला.(Australian Open 2026)

आता संपूर्ण टेनिस विश्वाचे लक्ष एका महायुद्धाकडे लागले आहे—जोकोविच विरुद्ध अल्काराझ, अनुभव विरुद्ध युवा ताकद!(Australian Open 2026)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.