Australia Thump WI : १०००व्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने विंडिजचा उडवला धुव्वा

१००० आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळणारा ऑस्ट्रेलिया हा फक्त दुसरा संघ आहे. 

173
Australia Thump WI : १०००व्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने विंडिजचा उडवला धुव्वा
  • ऋजुता लुकतुके

ऑस्ट्रेलियन संघाने आपल्या १०००व्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिज संघाचा १० गडी राखून धुव्वा उडवला. हा सामना ऑस्ट्रेलियासाठी चांगलाच यादगार ठरला. एकतर १००० सामन्यांची मजल मारणारा ऑस्ट्रेलिया हा फक्त दुसरा संघ आहे. आणि दुसरं म्हणजे हा सामना ऑस्ट्रेलियाने फक्त सहाव्या षटकांतच खिशात टाकला. आधी विंडिज डाव त्यांनी २५ षटकांत ८६ धावांत गुंडाळला. आणि ही धावसंख्या ऑस्ट्रेलियन संघाने सहाव्या षटकांतच पार केली. (Australia Thump WI)

या विजयाबरोबरच ऑस्ट्रेलियाने विंडिज बरोबरीच ही मालिका ३-० ने जिंकली. आपल्या १००० एकदिवसीय सामन्यांपैकी ऑस्ट्रेलियन संघाने ६०९ सामने जिंकले आहेत. तर ३४८ सामने गमावले आहेत. आणि ३४ सामने अनिर्णित तर ८ सामने बरोबरीत सुटले आहेत. ऑस्ट्रेलियाची विजयाची टक्केवारी ६६ टक्के इतकी मजबूत आहे. (Australia Thump WI)

(हेही वाचा – Nitin Gadkari : रस्ते पायाभूत सुविधांचा विकास हा सांघिक भावनेचा परिणाम)

भारतीय संघाची यशाची टक्केवारी आहे इतकी

ऑस्ट्रेलिया व्यतिरिक्त भारत हा एकमेव संघ आहे ज्यांनी १००० पेक्षा जास्त सामने खेळला आहे. भारताने आपल्या १०५५ सामन्यांपैकी ५५९ सामने जिंकले आहेत. तर ४४३ गमावले आहेत. भारतीय संघाची (Indian team) यशाची टक्केवारी आहे ५२ टक्के. एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया हा सगळ्यात यशस्वी संघ आहे. यशाच्या टक्केवारीबरोबरच संघाने तब्बल ६ आयसीसी स्पर्धा जिंकल्या आहेत. (Australia Thump WI)

आयसीसी (ICC) क्रमवारीत दोनदा अव्वल स्थान १२ महिने कायम राखलं आहे. भारताचे १०५५ एकदिवसीय सामने, ऑस्ट्रेलियाचे १००० एकदिवसीय सामने यानंतर तिसरा क्रमांक लागतो तो पाकिस्तानचा. त्यांनी आतापर्यंत ९७० एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. आणि त्यांचीही यशाची टक्केवारी ५२ टक्के इतकी आहे. (Australia Thump WI)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.