Asian Para Games 2023 : सुमित अंतिलची विश्वविक्रमासह सुवर्णपदकाला गवसणी 

आशियाई पॅरालिम्पिक स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने तब्बल ३० पदकं मिळवली. आणि यात आघाडीवर होता विश्वविक्रमवीर सुमित अंतिल 

83
Asian Para Games 2023 : सुमित अंतिलची विश्वविक्रमासह सुवर्णपदकाला गवसणी 
Asian Para Games 2023 : सुमित अंतिलची विश्वविक्रमासह सुवर्णपदकाला गवसणी 

ऋजुता लुकतुके

चीनच्या होआंगझाओ इथं सुरू असलेल्या आशियाई पॅरालिम्पिक खेळात (Asian Para Games 2023) भारताच्या सुमित अंतिलने भालाफेकीत स्वत:चाच विश्वविक्रम मोडीत काढत सुवर्ण पदक जिंकलं. यावेळी त्याने ७३.२९ मीटर इतका दूर भाला फेकला. ही कामगिरी लक्षणीय मानली जात आहे.

अंतिल बरोबरच ॲथलेटिक्समध्ये आणखी भारताने ५ सुवर्ण जिंकली. आणि बुधवारी जिंकलेल्या ३० पैकी एकूण १७ पदकं भारताने याच क्रीडाप्रकारात जिंकली. सुमितचा आधीचा विक्रम ७०.३ मीटरचा होता. तीन मीटरने त्याने आपली कामगिरी उंचावली. भारताच्याच पुष्पेंद्र सिंगला कांस्य पदक मिळालं. २५ वर्षीय अंतिम एफ ६४ प्रकारात खेळतो. इथं पायाने अधू असलेले आणि कृत्रिम पाय लावलेले ॲथलीट एकमेकांशी भिडतात.

अंतिलने दिवसाची सुरुवात चांगली करून दिल्यावर भारताने दिवसभरात आणखी ५ सुवर्ण पदकं नावावर केली. यात अंकुर धामाने १५०० मीटर टी११ प्रकारात मिळवलेलं सुवर्णही लक्षवेधी ठरलं.

तर एफ४६ प्रकारच्या भालाफेकीत भारताला तीनही पदकं मिळाली. पूर्ण पोडिअम फिनिश असलेली भारताचा पहिल्या दिवशीपासूनची ही तिसरी वेळ. यात सुंदर गुर्जरने ६८.६० मीटरची भालाफेक केली. तर रिंकू हुडा दुसरा आणि अजित सिंग तिसरा आला.

तर महिलांच्या १५०० मीटर टी११ प्रकारातही भारताला सुवर्ण आणि रौप्य अशी दोन पदकं मिळाली. रक्षिता राजूने सुवर्ण तर लतिका किलाकाला रौप्य पदक मिळालं. पुरुषांच्या एफ३७ या भालाफेक प्रकारातही भारताच्या हेनीने सुवर्ण जिंकलं. दिवसातील शेवटचं सुवर्ण टी४७ या लांबउडी प्रकारात निमिषाला मिळालं.

याशिवाय भारतीयांनी पॅरा तिरंदाजी, पॅरा टेबल टेनिस आणि पॅरा बॅडमिंटनमध्येही पदकांची लूट केली. बॅडमिंटनमध्येही भारताला ६ कांस्य पदकं मिळाली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.