Asian Games Football Team : आशियाई क्रीडास्पर्धेसाठीच्या फुटबॉल संघात छेत्री एकमेव ओळखीचा चेहरा, स्टायमॅकविषयी निर्णय नाही

भारतीय फुटबॉल क्षेत्र सध्या ज्योतिष प्रकरणावरून ढवळून निघालं आहे. आणि त्याचवेळी आशियाई क्रीडास्पर्धेसाठीचा संघ जाहीर झाला आहे. प्रशिक्षक स्टायमॅक यांच्या विषयी मात्र फेडरेशनने कोणताही निर्णय घेतलेला नाही 

35
Asian Games Football Team : आशियाई क्रीडास्पर्धेसाठीच्या फुटबॉल संघात छेत्री एकमेव ओळखीचा चेहरा, स्टायमॅकविषयी निर्णय नाही
Asian Games Football Team : आशियाई क्रीडास्पर्धेसाठीच्या फुटबॉल संघात छेत्री एकमेव ओळखीचा चेहरा, स्टायमॅकविषयी निर्णय नाही

ऋजुता लुकतुके

आगामी आशियाई क्रीडास्पर्धांसाठी भारताच्या १७ जणांच्या फुटबॉल संघाची निवड जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये कर्णधार सुनील छेत्री हा एकमेव नावाजलेला चेहरा आहे. शिवाय ज्योतिष प्रकरणामुळे वादग्रस्त ठरलेले मुख्य प्रशिक्षक इगॉर स्टायमॅक संघाबरोबर असतील की नाही, हे ही अजून स्पष्ट नाही.

आशियाई स्पर्धेसाठी निवडलेल्या दुय्यम संघासाठी आणखीही एक कारण आहे. या स्पर्धेदरम्यानच देशातील महत्त्वाची फुटबॉल लीग अर्थात, इंडियन सॉकर लीग होणार आहे.  या व्यावसायिक लीगमधील संघांनी आपल्याशी करारबद्ध असलेले खेळाडू आशियाई क्रीडास्पर्धेसाठी करारातून मुक्त करण्यासाठी विरोध दर्शवला होता. अखेर फुटबॉल फेडरेशनने संघ मालकांना आणि सॉकर लीगला झुकतं माप दिलेलं दिसतंय.

खरंतर भारतीय फुटबॉल फेडरेशनने यापूर्वीच २२ जणांचा भारतीय संघ आशियाई स्पर्धेसाठी निवडलेला होता. पण, लीगमधील संघ मालकांनी विरोध केल्यानंतर सगळ्या संघांशी बोलणी करून संघाची फेरनिवड करण्यात आली आहे.

(हेही वाचा-Maratha Reservation : मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा १७वा दिवस, सरकारच्या शिष्टमंडळासोबत मध्यरात्री चर्चा)

सुनील छेत्रीच्या बाबतीत मात्र फेडरेशनने आपला आग्रह कायम ठेवला. आणि इतर नऊ खेळाडूंनाही लीगमधून बाहेर काढण्यात फेडरेशन यशस्वी झालं आहे. हे खेळाडू वगळता इतर खेळाडू मात्र अनुभवी आहेत. संघाचे मुख्य प्रशिक्षक इगॉर स्टायमॅक संघाबरोबर चीनला जातील की नाही, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. त्यांनी राष्ट्रीय सेवा म्हणजेच राष्ट्रीय संघाकडून खेळण्याला प्राधान्य दिलं होतं. पण, दुय्यम संघाची निवड झाल्यावर ते संघाबरोबर जातील का हे अजून स्पष्ट झालेलं नाही.

आशियाई स्पर्धेत भारतीय संघाची पहिली लढत चीनबरोबर १९ सप्टेंबरला होणार आहे. तर भारतीय गटात म्यानमार आणि बांगलादेश या इतर दोन संघांचा समावेश आहे. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपउपान्त्य फेरीत जातील. तर तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले तीन अव्वल संघही पुढील फेरीसाठी पात्र ठरणार आहेत.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.