- ऋजुता लुकतुके
भारत आणि पाकिस्तानमध्ये सीमेवर तणाव आता निवळला असला तरी त्याचे पडसाद क्रिकेट आणि हॉकीवर आणखी काही दिवस तरी उमटणारच आहेत. यंदा क्रिकेट तसंच हॉकीतही आशिया चषक स्पर्धा आणि ती सुद्धा भारतात रंगणार आहे. आणि या स्पर्धेत पाकिस्तानचा (Pakistan) सहभाग आता कठीण आहे. ‘आम्ही केंद्रसरकारच्या (Central Govt) निर्देशांचं पालन करू,’ असा परखड इशारा हॉकी इंडियाने या बाबतीत दिला आहे. (Asia Cup Hockey)
(हेही वाचा – Murshidabad Violence : “एसआयटी अहवालात हिंदूंवरील क्रूरताच”; भाजपाची ममतादीदी सरकारवर सडकून टीका)
हॉकीतील आशिया चषक (Asia Cup Hockey) ही महत्त्वाची स्पर्धा आहे. आणि यंदा २७ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरदरम्यान ही स्पर्धा बिहारच्या राजगीर इथं भरवली जाणार आहे. या स्पर्धेतील विजेत्याला नेदरलँड्स (Netherlands) इथं होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेचं (World Cup) तिकीट मिळणार आहे. त्यामुळे ही स्पर्धा महत्त्वाची आहे. त्याचवेळी स्पर्धेतील पाकिस्तानच्या सहभागावर आता प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. तसंच भारत – पाक सामना होईल का असाही प्रश्न आहे. त्यावर हॉकी इंडियाचे सरचिटणिस भोलानाथ सिंग (Bholanath Singh) यांनी पहिल्यांदाच मीडियाला उत्तर दिलं. (Asia Cup Hockey)
(हेही वाचा – National Herald Case : “गांधी कुटुंबाने आर्थिक गैरव्यवहारातून १४२ कोटी कमविले”; ईडीचा न्यायालयात मोठा दावा)
‘आशिया चषक स्पर्धा भारतात होणार आहे. पण, आमच्यासाठी देश पहिला असेल. केंद्रसरकार जो निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य असेल,’ असं भोलानाथ पत्रकारांशी बोलताना म्हणाले. पाकिस्तान हॉकी फेडरेशनने आपला संघ स्पर्धेत खेळवण्याची तयारी दाखवली आहे. इतकंच नाही तर पाक खेळाडूंना सुरळीतपणे भारताचा व्हिसा मिळावा यासाठी आशियाई हॉकी संघटनेला मध्यस्थी करण्याचं आवाहनही पाक फेडरेशनने केलं होतं. भोलानाथ हे आशियाई संघटनेचे उपाध्यक्ष आहेत. ‘हॉकी इंडिया आणि आशियाई संघटना यांचा मी पदाधिकारी असलो तरी आधी भारताचा नागरिक आहे. त्यामुळे केंद्राच्या निर्णयाच्या बाहेर मी जाणार नाही,’ असं भोलानाथ यांनी ठणकावून सांगितलं आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community