Anush Agarwalla : घोडेस्वारी प्रकारात अनुष अगरवाला पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र 

आशियाई क्रीडास्पर्धेतही अनुषने पदक जिंकलं होतं. 

126
Anush Agarwalla : घोडेस्वारी प्रकारात अनुष अगरवाला पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र 
  • ऋजुता लुकतुके

घोडेस्वारीच्या ड्रेसेज प्रकारात भारताचा अनुष अगरवालाने (Anush Agarwalla) पॅरिस ऑलिम्पिकसाठी कोटा मिळवल्याचं भारतीय घोडेस्वारी फेडरेशनने जाहीर केलं आहे. अनुषने होआंगझाओ इथं झालेल्या आशियाई क्रीडास्पर्धेतही ऐतिहासिक कांस्य पदक जिंकलं होतं. पोलंड, नेदरलँड्स, जर्मनी आणि बेल्जिअम इथं झालेल्या ४ स्पर्धांमध्ये ७० टक्क्यांच्या वर गुण मिळवून अनुषने भारतासाठी ऑलिम्पिक पात्रता निकष पूर्ण केला आहे. (Anush Agarwalla)

खेळाडूला मिळालेला कोटा हा देशासाठी असतो. त्यामुळे भारतीय फेडरेशन अंतिम ट्रायल घेऊन या जागेवर कुणाला ऑलिम्पिकसाठी पाठवायचं याचा निर्णय घेणार आहे. ‘पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्रता निकष पूर्ण करु शकल्यामुळे मी खूप आनंदी आहे. ऑलिम्पिक पात्रता हे लहानपणापासून पाहिलेलं स्वप्न आहे. आणि देशासाठी हे मी करू शकलो, याचा अभिमान वाटतो,’ असं २४ वर्षीय अनुषने (Anush Agarwalla) म्हटलं आहे. (Anush Agarwalla)

(हेही वाचा – Ind vs Eng 4th Test : चौथ्या रांची कसोटीत के एल राहुल परतणार)

करामतीचे काठिण्य स्तरानुसार इतके प्रकार

भारतीय घोडेस्वारी फेडरेशनचे अध्यक्ष जयवीर सिंग यांनी अनुषचं (Anush Agarwalla) अभिनंदन केलं आहे. यापूर्वी दर्या सिंग (१९८०, मॉस्को), इंद्रजीत लांबा (अटलांटा, १९९६), इम्तियाझ अनिस (२०००, सिडनी) आणि फौआद मिश्रा (२०२२, टोकयो) या मोजक्याच घोडेस्वारांनी भारताचं ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. ड्रेसेज प्रकारात घोडा आणि घोडेस्वाराला २० बाय ६० मीटरच्या क्रीडांगणात प्रात्यक्षिकं करून दाखवायची असतात. (Anush Agarwalla)

मैदानाच्या भोवती असलेलं कुंपण कुठल्याही परिस्थितीत घोड्याने ओलांडायचं नाही, नाहीतर घोडेस्वार बाद ठरवला जातो. आणि कुंपणाच्या आत १२ अक्षरं लिहिलेली असतात. ही अक्षरं प्रत्येक घोडेस्वारीची करामत कुठे सुरू होणार आणि कुठे संपणार हे सांगणारी असतात. करामतीचे काठिण्य स्तरानुसार ७ प्रकार असतात. आणि प्रत्येक प्रकारासाठी शून्य ते दहा च्या दरम्यान गुण दिले जातात. एकूण गुणांची टक्केवारी काढण्यात येते. (Anush Agarwalla)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.