IPL 2025, Vaibhav Suryavanshi : वैभव सुर्यवंशीला ‘नशीबवान’ म्हणणाऱ्या शुभमन गिलवर अजय जडेजाची टीका

गुजरात टायटन्स विरुद्ध वैभवने ३८ चेंडूंत १०१ धावा केल्या.

70
IPL 2025, Vaibhav Suryavanshi : वैभव सुर्यवंशीला ‘नशीबवान’ म्हणणाऱ्या शुभमन गिलवर अजय जडेजाची टीका
IPL 2025, Vaibhav Suryavanshi : वैभव सुर्यवंशीला ‘नशीबवान’ म्हणणाऱ्या शुभमन गिलवर अजय जडेजाची टीका
  • ऋजुता लुकतुके

वैभव सुर्यवंशीच्या ३८ चेंडूंत १०१ धावांच्या खेळीमुळे सोमवारी २८ एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सच्या २१० धावांचा अगदी आरामात पराभव केला. सामना संपल्यानंतर बक्षीस समारंभात बोलताना गुजरातचा कर्णधार शुभमन गिलने (Shubman Gill) वैभवच्या शतकाचा उल्लेख ‘नशीबवान’ असा केला होता. ‘वैभवचा दिवस होता आज. त्याच्याकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. आणि ती त्याने पुरेपूर वापरली,’ इतकंच त्याच्या शतकाविषयी शुभमन गिल (Shubman Gill) बोलला होता. यावर इंटरनेटवर शुभमनवर टीका होतेच आहे. शिवाय माजी क्रिकेटपटू अजय जडेजानेही (Ajay Jadeja) शुभमनला खडे बोल सुनावले आहेत.

‘१४ वर्षांचा एक मुलगा स्वत:वर पूर्ण भरवसा ठेवून अशा प्रकारची खेळी साकारतो. आणि प्रतिस्पर्धी कर्णधार त्याची नशीबवान खेळाडूंमध्ये संभावना करतो, हे शुभमन गिलला (Shubman Gill) शोभणारं नाही. शुभमनने वैभवला त्याच्या कामगिरीचं श्रेय दिलं पाहिजे होतं,’ असं अजय जडेजा (Ajay Jadeja) स्टार स्पोर्ट्सवरील कार्यक्रमात बोलताना म्हणाला. वैभव सुर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) सोमवारी ३८ चेंडूंत १०१ धावा करताना ११ व्या षटकातच आपलं शतक पूर्ण केलं. त्याने ११ षटकार आणि ७ चौकारांची आतषबाजी केली. आणि राजस्थानला २१० धावांचा पाठलाग करताना ८ गडी राखून विजय मिळवून दिला.

(हेही वाचा – Beggars : भिक्षागृहातील भिक्षेकऱ्यांचा मेहनताना ५ रुपयांवरून ४० रुपये; ५७ वर्षांनंतर पहिल्यांदाच वाढ)

वैभवचा या हंगामातील हा तिसरा सामना होता. नियमित कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) दुखापतग्रस्त झाल्यानंतर वैभवला संधी मिळाली. पण, आतापर्यंत त्याने हंगामा केला आहे. ३ सामन्यांमध्ये त्याने २०२ च्या स्ट्राईकरेटने १५१ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ७५.५० धावांची आहे. वैभवची आधीची कामगिरी पाहता त्याला आता मिळालेलं यश हे नशिबाने मिळालेलं नाही, हे त्याने सिद्ध केलं आहे, असं जडेजाचं म्हणणं आहे. ‘१९ वर्षांखालील संघ आणि बिहारसाठी प्रथमश्रेणी सामन्यांत वैभवने आधीच आपली चमक दाखवली आहे. आणि त्याच्या जोरावरच त्याने आयपीएलमध्येही (IPL 2025) स्थान मिळवलं. त्यामुळे त्याला नशीबवान म्हणणं हे योग्य नव्हे,’ असं अजय जडेजाला (Ajay Jadeja) सुचवायचं होतं.

फक्त माजी क्रिकेटपटूच नाही तर सोशल मीडियावरही शुभमन गिलवर (Shubman Gill) अखिलाडूवृत्ती दाखवल्याचा आरोप होत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.