Rohit Sharma : विराट कोहली पाठोपाठ बीसीसीआयकडून आयपीएल योगदानासाठी रोहित शर्माचाही सत्कार

विराट आणि रोहित यांनी आयपीएलचे १८ हंगाम पूर्ण केले आहेत.

95
Rohit Sharma : विराट कोहली पाठोपाठ बीसीसीआयकडून आयपीएल योगदानासाठी रोहित शर्माचाही सत्कार
Rohit Sharma : विराट कोहली पाठोपाठ बीसीसीआयकडून आयपीएल योगदानासाठी रोहित शर्माचाही सत्कार
  • ऋजुता लुकतुके

विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) या भारतीय संघातील स्टार खेळाडू यंदा आपला १८ वा हंगाम खेळत आहेत. त्यामुळे काही दिवसांपूर्वी विराट कोहलीचा (Virat Kohli) बीसीसीआयकडून खास सत्कार करण्यात आला होता. त्याच धर्तीवर आता रोहित शर्माचाही (Rohit Sharma) मुंबईतील सामन्यापूर्वी बीसीसीआयचे (BCCI) अध्यक्ष रॉजर बिन्नी (Roger Binny) यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. ‘आयपीएल १८’ ही अक्षरं कोरलेलं विशेष तबक दोघांना देण्यात आलं.

आयपीएलच्या (IPL) पहिल्या हंगामापासून रोहित लीगमध्ये खेळतोय. पहिल्या हंगामात तो तेव्हाच्या डेक्कन चार्जर्सकडून खेळला होता. २०११ मध्ये तो मुंबई इंडियन्सकडे (Mumbai Indians) आला. तिथून पुढे दोघांमध्ये एक परंपराच तयार झाली. तो मुंबईकडे असताना फ्रँचाईजीने पाचवेळा या लीगचं विजेतेपद पटकावलं. महेंद्र सिंग धोनीच्या (MS Dhoni) बरोबरीने तो आयपीएलमधील सगळ्यात यशस्वी कर्णधार मानला जातो. कारण, तो मुंबईचा कर्णधार झाल्यावर फ्रँचाईजीने पाचवेळी विजेतेपद पटकावलं.

(हेही वाचा – IPL 2025, Rohit Sharma : ‘त्याची जाण्याची वेळ आता आलीय,’ – विरेंद्र सेहवाग)

आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यात विराट कोहलीचाही (Virat Kohli) याच पद्धतीने सत्कार करण्यात आला होता. कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूबरोबर (RCB) अगदी सुरुवातीपासून आहे. या फ्रँचाईजीचा तो चेहरा आहे. तर आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा मानही यंदा विराट कोहलीने (Virat Kohli) पटकावला आहे. इतकंच नाही तर विराटने आयपीएलमधील वैयक्तिक कामगिरीने लीगचं नाव जगभरात मोठं केलं आहे. रोहितच्या वैयक्तिक खेळी आणि संघाला दिलेलं खंबीर नेतृत्व तर विराटने लीगमध्ये दिलेलं योगदान यासाठी बीसीसीआयने दोन्ही खेळाडूंचा गौरव केला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.