-
ऋजुता लुकतुके
कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाचा फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने (Varun Chakaravarthy) नुकतीच एक इन्स्टा पोस्ट शेअर केली आहे. त्यातून अभिषेक नायर (Abhishek Nayar) पुन्हा कोलकाता संघाच्या ताफ्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या पोस्टमध्ये वरुण चक्रवर्तीने (Varun Chakaravarthy) आपला कोलकाता नाईट रायडर्स जर्सीतील फोटो टाकला आहे. आणि त्याच्या सोबत अभिषेक नायर दिसत आहे. इतकंच नाही तर वरुणने या स्टोरीत अभिषेक नायरला (Abhishek Nayar) टॅग केलं आहे. त्यामुळेच नायर कोलकाताकडे परतणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
बीसीसीआयने (BCCI) अभिषेक नायरचं सहाय्यक प्रशिक्षक म्हणून कंत्राट रद्द केल्याचं समजतंय. केवळ ८ महिन्यांत नायरची या पदावरून हकालपट्टी झाली आहे. आणि बीसीसीआयने यावर अधिकृत माहिती दिली नसली तरी नायरची गच्छंती अटळ असल्याचं मानलं जातंय. त्यातच इन्स्टा स्टोरीनंतर ही नवीन चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावर तर लगेचच ही पोस्ट व्हायरल होऊन प्रतिक्रिया सुरू झाल्या आहेत.
(हेही वाचा – Rohit Sharma : वानखेडे मैदानात स्टँडला नाव दिलं गेल्यावर रोहित शर्माला कसं वाटतंय?)
📲 Varun Chakravarthy’s Instagram story.
Homecoming 🔜 pic.twitter.com/1LBJG11rkr
— KKR Vibe (@KnightsVibe) April 17, 2025
कोलकाता नाईट रायडर्स बरोबर असताना अभिषेक नायरने (Abhishek Nayar) युवा खेळाडूंबरोबर काम केलं आहे. शुभमन गिल, वरुण चक्रवर्ती (Varun Chakaravarthy) आणि वेंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) यांच्या वाटचालीत नायरचा वाटा असल्याचं बोललं जातं. या तिघांनी मिळून कोलकाता फ्रँचाईजीला तीनदा आयपीएल लीग जिंकून दिली आहे. त्यामुळे अभिषेक नायर (Abhishek Nayar) कोलकाता फ्रँचाईजीकडे परतू शकतो. २०२४ साली कोलकाताने लीग जिंकली तेव्हा गौतम गंभीर (Gautam Gambhir) संघाचा मार्गदर्शक आणि अभिषेक नायर फलंदाजीचा प्रशिक्षक होता.
तिथेच गंभीर आणि नायर यांची मैत्री झाली. आणि गंभीर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक झाल्यावर त्याने सहाय्यक प्रशिक्षक पदावर नायरची वर्णी लावली. भारतीय संघाचा न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत पराभव झाल्यानंतर बीसीसीआयने (BCCI) प्रशिक्षकांच्या चमूत बदल करण्याचं ठरवलं आहे. आणि यात अभिषेक नायरची (Abhishek Nayar) गच्छंती होणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community