Abhishek Nayar : अभिषेक नायरची सहाय्यक प्रशिक्षक पदावरून हकालपट्टी?

Abhishek Nayar : सचिव म्हणतात, तुम्हाला दोन दिवसांत कळेल.

102
Abhishek Nayar : अभिषेक नायरची सहाय्यक प्रशिक्षक पदावरून हकालपट्टी?
Abhishek Nayar : अभिषेक नायरची सहाय्यक प्रशिक्षक पदावरून हकालपट्टी?
  • ऋजुता लुकतुके

बीसीसीआयने भारतीय संघाचा सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायरला पदावरून हटवल्याची बातमी आहे. पण, त्याचवेळी टाईम्स समुहाने बीसीसीआयचे सचिव देवाजीत साकियांच्या (Devajit Saikia) हवाल्याने दिलेल्या बातमीनुसार, याविषयीची अधिकृत माहिती दोन दिवसांत मीडियाला देण्यात येईल. पण, बीसीसीआयमध्ये अंतर्गत गोटात बऱ्याच घडामोडी घडताना दिसून येत आहेत. गुरुवारी दुपारी अभिषेक नायरचं (Abhishek Nayar) कंत्राट अचानक रद्द केल्याची बातमी आली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये झालेल्या चर्चा मीडियापर्यंत पोहोचल्या होत्या. आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने (Gautam Gambhir) त्याविषयी उघड नाराजी व्यक्त केली होती.

तेव्हापासूनच अभिषेक नायरचा (Abhishek Nayar) पत्ता कट होण्याविषयी चर्चा सुरू होती. शिवाय चॅम्पियन्स करंडकादरम्यान (Champions Trophy) सितांशू कोटक (Shitanshu Kotak) यांची फलंदाजीचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली होती. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि त्यांच्या हाताखाली रायन टेन डोशेटे, सीतांशू कोटक (Shitanshu Kotak) व मॉर्नी मॉर्केल (Morne Morkel) हे तीन प्रशिक्षक आहेत. त्यामुळे एक सहाय्यक प्रशिक्षक अतिरिक्त असल्याची चर्चा तशीही होतीच.

(हेही वाचा – Nashik Satpir Dargah : नाशिक काठे गल्लीतील कट्टरपंथींचा पोलिसांवरील हल्ला पूर्वनियोजित ; पोलिसांचे शिक्कामोर्तब ! राजकीय कनेक्शन उघड)

आता झाल्या प्रकारावर येत्या एक दोन दिवसांत बीसीसीआयकडून स्पष्टता येण्याची शक्यता आहे. ‘अभिषेक नायरविषयी (Abhishek Nayar) येत्या १-२ दिवसांत चित्र स्पष्ट होईल,’ असं सैकिया यांनी टाईम्स समुहाशी बोलताना म्हटलं आहे. गौतम गंभीर (Gautam Gambhir) मुख्य प्रशिक्षक झाल्यावर अभिषेक नायरची (Abhishek Nayar) वर्णी लागली होती. आणि त्याच्या नेमणुकीला फक्त ८ महिने झाले आहेत. त्यामुळे त्याचं कंत्राट अर्धवटच संपुष्टात आलं आहे.

फक्त अभिषेक नायरच (Abhishek Nayar) नाही तर टी दिलीप आणि ट्रेनर सोहम देसाई यांनाही घरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे. ड्रेसिंग रुममधील बोलणं मीडियापर्यंत पोहोचवण्याच्या गोष्टीचीही बीसीसीआयने (BCCI) गंभीर दखल घेतली आहे. तर कुठल्याही प्रशिक्षकाला तीन वर्षांपेक्षा जास्त पदावर ठेवलं जाणार नाही, त्यामुळे दिलीप खेळाडूंमध्ये लोकप्रिय असतानाही त्याचं कंत्राट रद्द होणार आहे. दिलीप यांच्या जागी ड्युसकाटे काम करतील. तर सोहम देसाईंची (Soham Desai) जबाबदारी आता ॲड्रियन ली रॉक्स सांभाळणार आहेत.

भारतीय संघ आयपीएलनंतर जून महिन्यात इंग्लंडचा दौरा करणार आहे. तोपर्यंत क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक टी दिलीप यांचीही मुदत संपत आहे. त्यामुळे बीसीसीआयकडून (BCCI) या नियुक्ती होऊ शकतात. इंग्लंड विरुद्ध भारतीय संघ पाच कसोटी खेळणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय अ संघाही इंग्लिश अ संघाशी ३ कसोटींची एक मालिका खेळणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.