6 Sixes in 1 Over : आंध्रप्रदेशच्या युवा खेळाडूचे एका षटकात ६ षटकार

सी के नायडू करंडक स्पर्धेत वामशी कृष्णाने हा विक्रम केला आहे. 

165
6 Sixes in 1 Over : आंध्रप्रदेशच्या युवा खेळाडूचे एका षटकात ६ षटकार
  • ऋजुता लुकतुके

एका षटकात सहा षटकार लगावले जाणं ही गोष्ट क्रिकेटमध्ये दुर्मिळच म्हणूनच जगभरात तिची हेडलाईन होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर दक्षिण आफ्रिकेचा हर्शेल गिब्ज हा एका षटकांत ६ षटकार ठोकणारा पहिला फलंदाज. त्यानंतर २००७ च्या टी-२० विश्वचषका दरम्यान युवराज सिंगने इंग्लिश गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला सहा षटकार लगावले होते. याशिवाय गॅरी सोबर्स आणि रवी शास्त्री यांनी प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये ही किमया केली आहे. तर अगदी अलीकडे विजय हजारे चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत ऋतुराज गायकवाडनेही ६ षटकार लगावण्याची कामगिरी केली आहे. (6 Sixes in 1 Over)

आता आंध्रप्रदेशचा युवा फलंदाज वामशी कृष्णा या सन्माननीय यादीत जाऊन बसला आहे. कर्नल सी के नायडू करंडक स्पर्धेत २३ वर्षांखालील गटात वामशीने रेल्वेचा फिरकीपटू दमनदीप सिंगला ६ वेळा सीमारेषेपार भिरकावून दिलं. (6 Sixes in 1 Over)

(हेही वाचा – Maratha Reservation : अंजली दमानिया यांचा सरकारवर आरोप; आरक्षण टिकणार नाहीच; आता अजय बावसकरांना उभे केले…)

बीसीसीआयनेही घेतली वामशी कृष्णाच्या कामगिरीची दखल

त्याच्या या कामगिरीची दखल बीसीसीआयनेही त्वरित घेतली. ‘आंध्रप्रदेशचा युवा फलंदाज वामशी कृष्णाने एकाच षटकांत ६ षटकार लगावण्याचा पराक्रम केला आहे. आणि या सामन्यात त्याने ६० चेंडूंत ११० धावा केल्या,’ असं बीसीसीआयने ट्विटरमधील संदेशात लिहिलं आहे. (6 Sixes in 1 Over)

वामशीने या डावात एकूण १० षटकार आणि ९ चौका खेचले. पण, रेल्वे विरुद्धच्या या सामन्यात तरीही आंध्रप्रदेशचा संघ मागेच आहे. कारण, रेल्वेनं पहिल्या डावात ८६७ धावांचा डोंगर उभा केला आहे. आणि त्याचा पाठलाग करताना वामशीच्या शतकानंतरही आंध्रप्रदेशचा डाव ३७८ धावांत संपला. (6 Sixes in 1 Over)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.