World Tsunami Awareness Day 2023: त्सुनामी नैसर्गिक आपत्तीबाबत जागरुकता वाढवण्यावर भर देणार – युनेस्को

166
World Tsunami Awareness Day 2023: त्सुनामी नैसर्गिक आपत्तीबाबत जागरुकता वाढवण्यावर भर देणार - युनेस्को
World Tsunami Awareness Day 2023: त्सुनामी नैसर्गिक आपत्तीबाबत जागरुकता वाढवण्यावर भर देणार - युनेस्को

सर्वांत विनाशकारी आणि धोकादायक नैसर्गिक आपत्तीपैकी ”त्सुनामी” ही आपत्ती आहे. (World Tsunami Awareness Day 2023) 22 डिसेंबर 2015 रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने केलेल्या घोषणेनंतर 5 नोव्हेंबर 2016 रोजी जागतिक त्सुनामी दिन पहिल्यांदा अधिकृतपणे साजरा करण्याची घोषणा केली. तेव्हापासून दरवर्षी ५ नोव्हेंबर रोजी ‘जागतिक त्सुनामी जागरुकता दिवस’ साजरा केला जातो. या नैसर्गिक आपत्तीबाबत नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी, पुन्हा अशी परस्थिती उद्भवली तर या आपत्कालिन प्रसंगाला कसे तोंड द्यावे, जणेकरून अधिकाधिक लोकांचे प्राण वाचवता येतील, या उद्देशाने ‘जागतिक सुनामी ‘ दिननिमित्त त्याचे धोके आणि प्रतिबंध करण्यासाठी करायच्या उपाययोजनांबाबत माहिती दिली जाते.

समुद्रकिनाऱ्यावर किंवा महासागरात उसळणाऱ्या अतिप्रचंड महाकाय लाटा अशीही या ‘त्सुनामी’ची ओळख आहे. सर्वप्रथम २००४ साली हिंद महासागरात त्सुनामी नैसर्गिक आपत्तीची पहिली घटना घडली. यामध्ये लाखो लोकांचा मृत्यू झाला. इंडोनेशियातील उत्तर सुमात्राच्या पश्चिम किनारपट्टीवर भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याने त्सुनामीने हिंदी महासागराच्या किनारपट्टीला धडक दिली आणि विध्वंस घडला. नेमकी या त्सुनामीची निर्मिती कशी झाली? यामागची नेमकी कारणे काय ? याबाबत जाणून घेऊया –

डिसेंबर २००४ साली घडलेल्या या घटनेत इंडोनेशिया, श्रीलंका, भारत आणि थायलंडसह १४ देशांतील २ लाख २७ हजार लोकांचा मृत्यू झाला होता. ही भयंकर नैसर्गिक आपत्ती महिला, मुले, अपंग आणि वृद्धांसाठी मोठा धोका ठरते. या त्सुनामीचे विनाशकारी परिणाम होऊ शकतात.

(हेही वाचा – Toll Plazas In Mumbai : मुंबईतील टोल प्लाझाच्या ठिकाणी स्वच्छता राखा; महापालिकेचे एमएसआरडीसीला निर्देश)

त्सुनामी म्हणजे ?
त्सुनामी हा जपानी शब्द ‘त्सू’ म्हणजे बंदर आणि नामी म्हणजे लहर यावरून आला आहे. भूकंप, भूस्खलन किंवा ज्वालामुखीचा उद्रेक यांसारख्या समुद्रातील एखाद्या घटनेमुळे निर्माण होणारी त्सुनामी ही महाकाय लाट आहे. त्सुनामीच्या महाकाय लाटा समुद्राच्या तळाजवळ किंवा खाली भूवैज्ञानिक बदलांमुळे निर्माण होतात. या लाटा प्रचंड आकार धारण करू शकतात आणि त्या महासागर ओलांडून जमिनीवर पोहोचतात.

त्सुनामीची निर्मिती ?
१. समुद्राखालील भूकंप (Undersea Earthquakes):
भूस्खलन, ज्वालामुखीचा उद्रेक किंवा महासागरावर पडणाऱ्या मोठ्या उल्कापिंडाच्या प्रभावामुळे त्सुनामी उदभवू शकते. बहुतेक विनाशकारी त्सुनामी समुद्राखालील भूकंपांमुळे निर्माण होतात. ज्यांचा केंद्रबिंदू फॉल्ट लाइनजवळ किंवा ५० किमीपेक्षा कमी खोलीवर होतो.

२. भूस्खलन (Landslides) :
भूस्खलन, तसेच खडकांचे कोसळणे, बर्फाचे कोसळणे (Avalanches) इत्यादींमुळे समुद्रातील पाण्याचे विस्थापन झाल्यामुळे त्सुनामी लाटा निर्माण होतात. १९८० च्या दशकात दक्षिण फ्रान्सच्या किनारपट्टीवर विमानतळाच्या धावपट्टीच्या बांधकामामुळे पाण्याखाली भूस्खलन झाले. त्यामुळे थेब्स बंदरात विनाशकारी त्सुनामीच्या लाटा उसळल्या. समुद्राच्या तळाला भूकंप होऊन पाण्याखाली भूस्खलन होते. त्यामुळेदेखील त्सुनामी तयार होते.

३. ज्वालामुखीचा उद्रेक (Volcanic Eruptions) :
समुद्राखाली ज्वालामुखीचा उद्रेक होतो, तेव्हा तेव्हा समुद्राच्या पाण्याचे अचानक विस्थापन होते आणि त्सुनामीच्या लाटा तयार होतात. इंडोनेशियातील क्राकाटोआच्या ज्वालामुखीचा स्फोट २६ ऑगस्ट १८८३ रोजी नोंदवलेल्या सर्वांत मोठ्या आणि सर्वांत विनाशकारी त्सुनामींपैकी एक होता. या स्फोटामुळे सुमारे ४० मीटर उंचीच्या लाटा निर्माण झाल्या; ज्याने जावा व सुमात्रा या दोन्ही बेटांमधील सुंदा सामुद्रधुनीलगतच्या किनारपट्टीच्या भागात विनाशात्मक परिस्थिती निर्माण केली आणि त्यामुळे ३६,००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.

४. उल्का आणि लघुग्रह (Meteorites and Asteroids) :
समुद्रात उल्का आणि लघुग्रह पडून त्सुनामी निर्माण होण्याचा संभाव्य धोका असतो.

युनेस्कोची संकल्पना…
या वर्षीच्या जागतिक त्सुनामी जागृती दिनानिमित्त युनेस्कोने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर लिहिले आहे की, जागतिक त्सुनामी जागरुकता दिवसाचं औचित्त्य साधून सागरी भागात किंवा बेटांच्या भागात राहणारे जे लोक पूर्वी या आपत्तीला सामोरे गेले आहेत. त्यांच्यावर भूतकाळात येऊन गेलेल्या या विपरित आपत्तीकडे मागे वळून पाहिलं तर पर्यावरणाच्या या ऱ्हासाबाबत सज्ज राहणं आपल्या हातात आहे. त्यामुळे आपत्तीवर नियंत्रण कसं मिळवणं, त्याबाबात जागरुक राहणं, हे ध्येय युनेस्कोने स्वीकारलं आहे तसेच या आपत्कालिन परिस्थितीशी निगडीत जी संकट आहेत उदा. गरिबी, असमानता, भविष्यात येणाऱ्या त्सुनामीचं स्वरुप भूतकाळातील त्सुनामीपेक्षाही बिभत्स असू शकतं या आपत्तींना सामोरं जाण्यासाठी लोकांना चालना कशी मिळेल, विपरित नैसर्गिक आपत्तीला कसे तोंड देता याबाबत नागरिकांना जागरुक करण्यावर भर दिला जाणार असल्याचे युनेस्कोचे ध्येय आहे. याअंतर्गत यावर्षी या दिनानिमित्त ‘Fighting Inequality for a Resilient Future’ ही संकल्पना राबवायचे युनेस्कोने ठरवले आहे. डब्ल्यूटीएडी 2023 (World Tsunami Awareness Day 2023) हा उपक्रम राबवण्यात येणार आहे तसेच त्सुनामी नैसर्गिक आपत्तीबाबत जागरुकता वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.