World Book and Copyright Day: कॉपिराइट म्हणजे काय? आणि का साजरा केला जातो जागतिक पुस्तक व कॉपिराइट दिन?

42

World Book and Copyright Day दरवर्षी २३ एप्रिल रोजी साजरा केला जातो. मित्रहो, आता पुस्तकांची जागा इंटरनेट (Internet) आणि संगणकांनी (computer) घेतली आहे. पुस्तकांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आणि येणाऱ्या पिढ्यांना ते ज्ञान देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी कॉपिराइटच्या (Copyright) महत्त्वांबद्दलही विचारमंथन केले जाते.

(हेही वाचा – UPSC 2025 चा निकाल जाहीर: शक्ती दुबे देशात पहिला, तर पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा)

जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन पहिल्यांदा १९९५ मध्ये साजरा करण्यात आला, जेव्हा युनेस्कोने (UNESCO) हा दिवस पुस्तके आणि वाचनाचा जागतिक उत्सव म्हणून घोषित केला. १६१६ मध्ये याच दिवशी मृत्युमुखी पडलेल्या विल्यम शेक्सपियर, मिगुएल डी सर्व्हेंटेस आणि इंका गार्सिलासो डे ला वेगा यांच्या स्मृती दिनानिमित्त २३ एप्रिल हा दिनांक निवडण्यात आला.
पहिला हा पुस्तक दिन ७ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात आला, जो मिगुएल डी सर्व्हेंटेस यांचा जन्मदिनामित्त साजरा केला होता. मात्र त्यानंतर, मिगुएल डी सर्व्हेंटेस यांच्या मृत्युदिनाचा म्हणजेच २३ एप्रिल हा दिवस साजरा करण्यासाठी निवडण्यात आला. युनेस्कोने विल्यम शेक्सपियर, मिगुएल सर्व्हेंटेस आणि इंका गार्सिलासो डे ला वेगा यांच्यासारख्या महान साहित्यिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी २३ एप्रिल रोजी जागतिक पुस्तक दिन साजरा करण्याचे जाहीर केले.

हा दिवस आपण का साजरा केला पाहिजे? तर चांगले जीवन जगण्यासाठी पुस्तकांची क्षमता यावर जोर दिला जातो. हा दिवस पुस्तके आणि वाचनाचा जागतिक उत्सव आहे आणि १०० हून अधिक देशांमध्ये साजरा केला जातो. त्याचबरोबर कॉपिराइटच्या अधिकारावर देखील भर दिला जातो. भारतात कॉपिराइट हा तोंडी लावन्यापुरता असला तरी विदेशात मात्र यावर गांभिर्याने विचार करण्यात आला आहे. भारतातही साहित्य चोरीला आल बसावा म्हणून हा दिवस उत्साहात साजरा केला गेला पाहिजे.

(हेही वाचा – उद्धव ठाकरे लँडस्कॅमचा बादशाह; मंत्री Ashish Shelar यांचा हल्लाबोल)

तुम्ही देखील तुमच्या परिसरात पुस्तक दिन (book day) साजरा करु शकता. पुस्तक प्रदर्शने, साहित्यिक कार्यक्रम, वाचकांच्या परिषदा, पुस्तक दान मोहीम आणि मुलांसाठी कथाकथन सत्रे घेऊन हा दिन जल्लोषात साजरा करता येतो. ग्रंथालयाला किंवा पुस्तकांच्या दुकानाला भेट देऊ शकता. एखाद्या लेखक किंवा कवीला भेटून त्यांना अभिवादन करु शकता. या दिवशी लेखकांचा सन्मान केला जातो. चला तर तुम्ही वाचलेली पुस्तकांची यादी आम्हाला सांगा आणि ती पुस्तके का आवडली हे देखील सांगा.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.