मुंबई मेट्रोत महिलेचा विनयभंग, एकाला अटक

100

मुंबईच्या मेट्रो ट्रेन मध्ये महिलेचा विनयभंग करणाऱ्या एकाला सह प्रवाशांनी पकडून अंधेरी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. नदीम रागीव (२९) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे, न्यायालयाने त्याला १ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

( हेही वाचा : कांजूरमार्ग भराव भूमीच्या क्षेत्रात खाडीलगत मातीचे बंधारे, सुमारे १९ कोटींचा करणार खर्च )

पोलिसांनी दिलेल्या माहिती पीडित महिला ही २४ वर्षांची असून डोंबिवली येथे राहणारी आहे, ती अंधेरी मरोळ येथे एका कार्यालयात नोकरीला आहे. बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पीडित महिलेने घाटकोपर येथून मेट्रो ट्रेन पकडली गर्दीची वेळ असल्यामुळे ती दरवाजा जवळ उभी होती, जागृती नगर मेट्रो स्थानक येताच आरोपी नदीम रागीव हा मेट्रो ट्रेन मध्ये चढला व त्याने चढताना पीडितेला पाठीमागून धक्का दिला. चुकून धक्का लागला असेल असे समजून पीडितेने त्याकडे दुर्लक्ष केले, परंतु काही वेळाने नदीम हा तिच्या पाठीमागे उभा राहून तिच्याशी अश्लील कृत्य करू लागला, व नको तिथे स्पर्श लागताच पीडित महिलेने सहप्रवासी महिलेला हा प्रकार सांगितला.

या दोघींनी इतर प्रवाशांच्या मदतीने त्याला ताब्यात घेऊन असल्फा स्थानकांवर उतरवून त्याला स्थानकावरील सुरक्षा रक्षकाच्या ताब्यात दिले, सुरक्षा रक्षक आणि तक्रारदार महिलेने ताब्यात घेतलेल्या इसमाला अंधेरी पोलीस ठाण्यात आणून त्याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. अंधेरी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ आणि ३५४- अ अंतर्गत विनयभंग आणि लैंगिक छळ केल्याप्रकरणी या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीत रागीव हा मूळचा बिहारचा रहिवासी असून त्याने काही महिन्यांपूर्वी तो मुंबईत नोकरीच्या शोधात आला होता, मुंबईत तो चेंबूर येथे राहत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.