वर्षानुवर्षे चलनी नोटांवर दिसणारा गांधींचा ‘हा’ फोटो नेमका आला तरी कुठून?

95

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींकडे गांधीसोबत भारतीय नोटेवर गणपती आणि लक्ष्मी यांचे फोटो छापण्यात यावे, अशी मागणी केली. यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक उलट-सुलट प्रतिक्रिया उमटल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, भारतात चलनी नोटा जारी करण्याचा अधिकार आणि नोटेवर कोणाचं चित्र किंवा फोटो छापले जाणार हे केवळ भारतीय रिझर्व्ह बँक ठरवत असते. पण नोटांवर असणाऱ्या गांधीच्या फोटोचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का?

आता तुम्हाला महात्मा गांधी पटोत किंवा न पटोत पण नोटांवरचे हे गांधी सगळ्यांनाच खिशात बाळगायलाच लागतात. पण तुम्ही कधी विचार केलाय का की वर्षानुवर्षे आपल्या चलनी नोटांवर दिसत असलेला गांधींचा हा फोटो नेमका आला कुठून..? माहित नसेल तर काही हरकत नाही आज या फोटोचा इतिहास आपण माहित करून घेऊ…

(हेही वाचा – Indian Currency: भारतीय नोटेवर कोणाचं चित्र किंवा फोटो छापले जाणार, हे कोण ठरवतं?)

  • भारतीय नोटांवरचा गांधींचा फोटो पाहून आपल्याला असे वाटते की ते स्केच किंवा पेटिंग असावं पण वास्तविक तो कॅमेऱ्याने काढलेला गांधीचा फोटो आहे. सध्याच्या राष्ट्रपती भवन आणि तत्कालीन व्हाईसरॉय हाउसच्या बाहेरचा हा फोटो असल्याचे सांगितले जाते.

gandhiji

  • एप्रिल १९४६ रोजी ब्रिटीश राजकारणी लॉर्ड फ्रेडरिक विल्यम पेथिक-लॉरेन्स आणि गांधी यांच्या एक भेट झाली होती. या भेटीदरम्यान हा फोटो घेण्यात आला होता. आणि हाच फोटो क्रॉप करून फक्त चेहरा या चलनीनोटांवर छापण्यात आला. दुर्दैवाने हा फोटो नेमका कोणी काढला याची माहिती मात्र अद्याप उपलब्ध झालेली नाही.
  • भारतीय चलनी नोटांवरील हा गांधींचा फोटो १९९६ सालापासून आहे. १९९६ साली ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’कडून चलनी नोटांची ‘महात्मा गांधी सिरीज’ सुरु करण्यात आली. याच सिरीजपासून सर्वप्रथम गांधी भारतीय नोटांवर दिसायला लागले होते.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.