-
स्वप्नील सावरकर
२२ एप्रिलच्या पहलगाम हल्ल्याद्वारे पाकड्यांनी हिंदुस्थानविरुद्ध पुन्हा एकदा थेट युद्धच छेडलंय. पण, आपण मात्र अजूनही त्यास युद्ध म्हणायला कचरत आहोत. खरंतर पाकिस्तानच्या निर्मितीपासूनच आपण शेजारी भाऊ नव्हे तर शत्रूच पैदा केलाय, हे किमान मान्य करणं गरजेचं आहे. पण स्वतंत्र हिंदुस्थानात आपल्याला शाळेतूनच शिकवण मिळते ती तथाकथित धर्मनिरपेक्षततेची! जगातल्या ९९ टक्के देशांना स्वतःचा धर्म असताना आपण मात्र सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली षंढत्व जोपासत आहोत की काय, अशी आता शंका (की खात्री?) येऊ लागलीये. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली अस्तित्वात आलेल्या राज्यघटनेतही सेक्युलर शब्द घुसडून काँग्रेसी पिलावळीने म्हणजेच तथाकथित सेक्युलर मंडळींनी देशाची बरबादीच लिहून ठेवली आहे का, असा संशय आता येतोय. एका बाजूला सेक्युलरिझमचा किडा चावलेला असतानाच दुसरीकडे आता युद्धविरोधी मानसिकता बिंबवणाऱ्या तथाकथित मानवतावादी जमातीला आवरण्याचं आव्हान आपल्यासमोर आहे. त्यातच, सोशल मीडियासारख्या नव्या शस्त्राचा वापर ही मंडळी आपल्यापेक्षा अधिक प्रभावीपणे करत आहेत. त्यांच्या नवनव्या टूलकिट्सचा सामना करण्याचे कठीण कार्य आपल्याला करावे लागणार आहे. या मंडळींच्या कंड्या, अफवा ओळखण्यापासून त्यांचा बाजार उठवण्यापर्यंतची लढाईही यापुढे महत्त्वाची ठरणार आहे. (Fake Narrative)
(हेही वाचा – Mumbai Airport : सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडून ५.१ कोटीचे सोने जप्त, २ जणांना अटक)
जिहादींचे खरे वाली कोण?
खरंतर, आपल्यासाठी रणांगणावरील युद्ध सोपं आहे. पण, या नव्या डिजीटल युगात सोशल मीडियावर लढलं जाणारं नरेटिव्हचं युद्ध कठीण बनलंय. युद्ध नको बुद्ध हवा, हे बोलणं सोपं आहे. पण, युद्धक्षमता नसेल तर बुद्धालाही जगू दिलं जाणार नाही, हे म्यानमारच्या रोहिंग्यांनी दाखवून दिलंय. आधी स्वतःच युद्ध घडवायचे आणि नंतर मानवतेच्या नावाखाली सहानुभूती गोळा करायची, असा धंदा जिहाद्यांनी जगभरात सुरू केलाय. जिथे जिथे ही इस्लामी जिहादी पिलावळ भूतदयेच्या छत्राखाली लपूनछपून निर्वासित म्हणून जाते, तिथे तिथे नंतर विनाशच घडवते, हे सातत्याने सप्रमाण सिद्ध होत असलेलं सत्य आहे. पण, आपण आहोत की सद्गुणविकृतीचा कळस गाठत सेक्युलरिझमची झापडं बाजूला करण्यास तयार नाही. अमेरिका, चीनसारखे दुटप्पी देश एकीकडे जिहाद्यांना मदत करतात आणि दुसरीकडे मानवतेच्या बाता करत शांतीचे श्रेयही लाटतात. स्वतःच्या जमिनीवर युद्ध नको, पण इतरांची राखरांगोळी करण्यास ही प्रगत राष्ट्रे कायम तत्पर असतात. चीनमधल्या उगर मुस्लिमांबाबत चिनी सत्ताधारी काय करत आहेत, हे सेक्युलरवाद्यांनी जगासमोर आणण्याचे धाडस केले तर आम्हीसुद्धा तुमच्या सेक्युलरिझमचा सन्मान राखण्यास तयार होऊ! (Fake Narrative)
असो, तर मुद्दा असा आहे की, पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याला आपण जोरदार प्रत्युत्तर तेरा दिवसांनी दिलं खरं. पाकिस्तानला चारी मुंड्या चीत करत थेट लाहोर, इस्लामाबादपर्यंत घुसून आपल्या सैन्यदलांनी त्यांची लायकी आणि आपली क्षमता दाखवून दिली. पण, दुर्दैव म्हणजे, आपलेच लोक आपल्या मीडियाला खोटं ठरवण्यात एक पाऊल पुढे राहिले. खरंतर, कोणत्याही वृत्तवाहिनीने देशविरोधी बातमी दिली नाही, हेही तितकेच खरे. कारण, २००८ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचे वृत्तांकन करतेवेळी अनेक चुका आपल्या वृत्तवाहिन्यांकडून घडल्या होत्या. अगदी प्रामाणिकपणे सांगायचे तर त्या चुकांचा साक्षीदार असल्याने यावेळच्या वृत्तांकनामध्ये काही चुका नक्कीच जाणवल्या. पण, देशविरोधी अशी कोणतीही कृती कोणत्याही वृत्तवाहिनीने केली, असे निदर्शनास आलेले नाही. काही वृत्तवाहिन्यांनी अतिगडद वृत्तांकन करताना तोल सोडला, हेही मान्य केले तरी ब्रेकिंगच्या धावपळीत थोड्याफार चुका क्षम्य मानल्या पाहिजेत, पहलगामनंतर जे काही सोशल मीडियावर युद्ध बघायला मिळतंय, ते पाहता या लिब्रांडू, पाकप्रेमी मंडळींचीही हवा काही कमी नाही, हेच लक्षात येतंय. आणि, मुख्य म्हणजे जसा मुसलमान एका जिहादच्या नाऱ्यासाठी आपसांतील सर्व मतभेद विसरून एकत्र येतो, तसेच हे सर्व अजेंड्याच्या टूलकिटसाठी एकत्र येताना दिसतात. पण, दुर्दैव म्हणजे हिंदुत्ववादी, राष्ट्रप्रेमी जनता इथेच कमी पडते. त्यांचा भलेही पाठिंबा असला तरी लिब्रांडूंच्या खोट्या प्रचाराला बळी पडत आपल्याच सरकारला, मीडियाला प्रश्न विचारण्याच्या नावाखाली विरोधी भूमिका घेतात. (Fake Narrative)
(हेही वाचा – Terrorist Abu Saifullah: पाकिस्तानातील सिंधमध्ये लष्कर कमांडर दहशतवादी अबू सैफुल्लाह ठार, अज्ञात हल्लेखोरांनी केली हत्या)
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी व्यक्त केलेल्या भीतीप्रमाणे देशविरोधी मुसलमान किंवा इतर कोणी नव्हे तर हिंदूच हिंदूचा शत्रू बनतो हे आपण यानिमित्ताने पुन्हा पाहिले. त्यामागे स्वतःला बुद्धिवादी म्हणवून घेण्याचा अट्टाहास असेल किंवा लोकशाहीवादी असल्याचा दाखला द्यायचा असेल. पण, अत्यंत चुकीच्या वेळी मोदीद्वेषाच्या नावाखाली देशविरोधी भूमिका विरोधकांनी घेतली आणि त्याचा फायदा पाकड्यांनी घेतला. केवळ पाकड्यांनीच नव्हे तर जगभरात हा प्रसार झाला की हिंदुस्थानी मीडिया खोटारडा आहे. पुरावे मागणाऱ्या गँगने तर उच्छादच मांडला आहे. पंतप्रधान मोदींना प्रेस घेण्याच्या आव्हानापासून वाट्टेल त्या पातळीवर टीका करण्यास ते कचरत नाहीत. पण, जेव्हा आपल्या सैन्यदलाने पुराव्यांसह पाकड्यांचा खोटेपणा समोर आणला तेव्हा एकही लिब्रांडू देशप्रेमी मीडियाच्या बातम्या कशा खऱ्या ठरल्या हे सांगताना दिसला नाही. अशा नालायकांमध्ये तो रवीश (रबीश) कुमार ते ध्रुव राठीपासून गल्लीबोळातल्या नाव न घेण्याच्या लायकीच्या वळवळकरांपर्यंतची यादी बनेल. अफवांच्या बाजारात या महाभागांचाही समावेश असतो पण त्यांचं सादरीकरण इतकं सुंदर असतं की जणू तेच खरे आणि जग खोटे असे वाटू लागते. त्यामुळे, सरकारचे नवे डिजीटल धोरण अधिक व्यापक, कठोर करणे ही काळाची गरज आहे. अर्थात, त्यातही हे धोरणही दुधारी शस्त्र बनू नये याची काळजी घेणे आलेच! (Fake Narrative)
थोडीशी आकडेवारी…
सोशल मीडिया आल्यापासून आजवर ज्या वेगाने तो वाढतोय ते पाहता पुढचं युद्ध नरेटिव्हचंच होणार हे त्रिवार सत्य आहे. त्यासाठी आपणही तयारी करतोच आहोत, पण ती अजूनही कमी पडतेय असे वाटतेय. २०२४ मधल्या एका अहवालानुसार, हिंदुस्थानातील लोकांनी १.१ लाख कोटी तास स्मार्टफोनवर घालवले आहेत. २०२५ मध्ये हा वेळ अधिक वाढतोय. थोडक्यात, आपण प्रत्येकजण सुमारे ५ तास रोज मोबाईल स्क्रीनवर घालवतो. यातला ७० टक्के वेळ हा सोशल मीडिया, गेमिंग आणि व्हिडिओ पाहण्यात जातो आणि उरलेला ३० टक्के वेळ काहीतरी प्रॉडक्टिव्ह कामांमध्ये उपयोगी पडतो, असे म्हणता येईल. टेलिकॉम कंपन्यांच्या अंदाजानुसार, येत्या ३ वर्षांत हिंदुस्थानात फक्त ५जी वापरणाऱ्यांची संख्याच ७७ कोटींवर जाईल. सुमारे १३० कोटी लोकसंख्येच्या हिंदुस्थानात १०० कोटींवर मोबाईल फोन असून त्यातले ८८ कोटींपेक्षा जास्त सोशल मीडिया वापरणारे आहेत. कोरोना संकटानंतर तर मोबाईलवरून इंटरनेट वापरण्याचे प्रमाण अधिकच वाढल्याची आकडेवारी सांगते. मुलांनाही शाळेतच मोबाईलद्वारे इंटरनेट उपलब्ध होते. त्यामुळे, हे दुधारी अस्त्र वापरण्याबाबत आपण खूपच काळजी घेणे गरजेचे आहे. (Fake Narrative)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community