VOC Park : मुलांचे सुट्टीतील आकर्षण केंद्र असलेले तमिळनाडूतील ‘हे’ उद्यान तुम्हाला माहिती आहे का ?

VOC Park : व्ही.ओ.सी. प्राणीसंग्रहालय आणि उद्यान 1965 साली 7 एकर क्षेत्रामध्ये स्थापन करण्यात आले होते. त्याला स्वातंत्र्यसैनिक व्ही.ओ. चिदंबरम पिल्लई यांचे नाव देण्यात आले आहे.

157
VOC Park : मुलांचे सुट्टीतील आकर्षण केंद्र असलेले तमिळनाडूतील 'हे' उद्यान तुम्हाला माहिती आहे का ?
VOC Park : मुलांचे सुट्टीतील आकर्षण केंद्र असलेले तमिळनाडूतील 'हे' उद्यान तुम्हाला माहिती आहे का ?

तमिळनाडूतील (Tamil Nadu) कोइंबतूर जंक्शनपासून गोपालपुरम परिसरात 2 किमी अंतरावर व्ही.ओ.सी. उद्यान आणि प्राणीसंग्रहालय आहे. चिदंबरनार उद्यान, हे कोइंबतूरमधील प्रमुख करमणुकीच्या ठिकाणांपैकी, तसेच पर्यटनस्थळांपैकी एक आहे. (VOC Park)

(हेही वाचा – NIA : जागतिक दहशतवाद्यांमध्ये बोरिवली-पडघाची ओळख आहे इस्लामिक राष्ट्र; NIAच्या आरोपपत्रात गंभीर खुलासे)

प्राण्यांच्या विविध प्रजाती पहाण्याची संधी

व्ही.ओ.सी. प्राणीसंग्रहालय आणि उद्यान 1965 साली 7 एकर क्षेत्रामध्ये स्थापन करण्यात आले होते. त्याला स्वातंत्र्यसैनिक व्ही.ओ. चिदंबरम पिल्लई यांचे नाव देण्यात आले आहे. कोईम्बतूर महानगरपालिकेद्वारे व्यवस्थापन केल्या जाणाऱ्या या उद्यानात 335 पक्षी, 106 सस्तन प्राणी आणि 54 सरपटणाऱ्या प्राण्यांसह सुमारे 890 प्राणी आहेत. उद्याने आणि प्राणीसंग्रहालय हे स्थानिकांसाठी एक पसंतीचे सहलीचे ठिकाण आहे. या उद्यानामुळे मुले प्राण्यांच्या जगाशी परिचित होतात. (VOC Park Coimbatore)

वर्षभर होतात विविध कार्यक्रम

या उद्यानात मुलांसाठी खेळाचे मैदान, मत्स्यालय आणि जुरासिक पार्क आहे, जिथे फक्त मुलेच नव्हे, तर प्रौढदेखील मजा करू शकतात. या उद्यानात आयोजित केल्या जाणाऱ्या विविध जत्रा, प्रदर्शने, वार्षिक कार्यक्रम आणि अनेक कला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही पर्यटकांना प्रवेश आहे. उद्यानाच्या परिसरात एक उपहारगृह देखील आहे. तिथे चहा, कॉफी, शीतपेये, सँडविच, बर्गर, नूडल्स इत्यादी काही स्वादिष्ट स्नॅक्स आणि पेये घेता येतात.

वेळ : दुपारी 4 ते संध्याकाळी 7.30, रविवारी सकाळी 10 ते संध्याकाळी 7.30 आणि मंगळवारी बंद

प्रवेशशुल्क : प्रौढांसाठी 3 रुपये आणि मुलांसाठी 2 रुपये

टॉय ट्रेन : प्रौढांसाठी 2 रुपये आणि मुलांसाठी 1 रुपया (VOC Park)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.