चकमकीत ठार केलेल्या गँगस्टर दुबेची १० कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त

115

आठ पोलीस कर्मचाऱ्यांना ठार करणाऱ्या आणि पोलीस चकमकीत ठार झालेला गँगस्टर विकास दुबे यांची अंमलबजावणी संचालनालयाने बुधवारी, २ ऑक्टोबर रोजी १० कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता मनी लाँड्रिंग विरोधी कायद्यांतर्गत जप्त करण्यात आली आहे. ही संपत्ती दुबे यांच्या कुटुंबाची आणि त्यांच्या सहकाऱ्यांची आहे.

गुन्हेगारी कृत्यातून जमवलेली संपत्ती

कानपूर आणि लखनऊमध्ये असलेल्या एकूण २८ स्थावर मालमत्ता जप्त करण्यासाठी मनी लाँडरिंग प्रतिबंध कायदा (PMLA) अंतर्गत आदेश जारी करण्यात आला. एकूण १०.१२ कोटी रुपयांची ही संपत्ती विकास दुबे, त्याचे कुटुंबीय, सहकारी जयकांत वाजपेयी, त्याचे कुटुंबीय आणि त्याचे (दुबेचे) सहकारी यांच्या नावावर आहे. ही सर्व संपत्ती दुबेने गुन्हेगारी कृत्यांमधून कमावलेली आहे, असे ईडीने सांगितले. १० जुलै २०२० रोजी सकाळी पोलीस चकमकीत दुबे मारला गेला. यावेळी दुबेच्या एन्काउंटरपूर्वी त्याचे पाच साथीदार वेगवेगळ्या पोलीस चकमकीत मारले गेले होते. कानपूरच्या चौबेपूर भागातील बिक्रू गावात डीएसपी देवेंद्र मिश्रा यांच्यासह आठ पोलिसांना घातपातात दुबेने ठार केले होते. याप्रकरणी त्याला अटक करण्याल आली होती. ईडीने सांगितले की, दुबे हा संघटित गुन्हेगारी, भूमाफिया, भ्रष्टाचार आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी (पीडीएस) निधीचा अपव्यय यांसारख्या विविध प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सामील होता.

(हेही वाचा अशोक गेहलोत गुलाम नबी आझादांच्या मार्गावर, काँग्रेसला करणार रामराम?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.