वाहन स्क्रॅपिंगसाठी आता असं करा डिजिटली अप्लाय!

74

वाहन स्क्रॅपिंग करण्याच्या नियमांत आता मोठा बदल करण्यात आला आहे. मोटार वाहन नियम 23 सप्टेंबर 2021मध्ये या सुधारणा करण्यात आल्या आहेत. यानुसार, आता वाहन स्क्रॅपिंगसाठी डिजीटली अप्लाय करता येणार आहे. या नियमांमध्ये केलेल्या बदलाबद्दल मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, मिळालेल्या फीडबॅकच्या आधारे हा नियम बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याद्वारे वाहन मालक, RVSF ऑपरेटर्स, डीलर्स, रिजनल ट्रान्सपोर्ट अथॉरिटीज इत्यादी सर्व भागधारकांसाठी  वाहन स्क्रॅपिंगची प्रक्रिया सुलभ आणि डिजिटल केली गेली आहे.

या नियमांत बदल

वाहन स्क्रॅपिंगसाठी डिजिटल पद्धतीने अप्लाय करण्याची तरतूद करण्यात आली आहे. वाहन मालक स्क्रॅपिंगसाठी सर्व अर्ज डिजिटली जमा करतील. RVSF वाहन मालकांना त्यांच्या वाहनांच्या स्क्रॅपसाठी डिजिटल पद्धतीने अर्ज करण्यास मदत करण्यासाठी एक सुविधा केंद्र काम करेल. याशिवाय वाहन मालकाने अर्ज सादर करण्यापूर्वी वाहन डेटाबेस तपासण्याचीही तरतूद करण्यात आली आहे.

प्रमाणपत्र डिजीटल रुपात उपलब्ध

वाहन जमा करताना, तसेच त्यानंतरही संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता राहावी म्हणून, स्क्रॅपिंगसाठी देण्यात आलेल्या वाहनाशी संबंधित प्रमाणपत्रामध्ये अधिक डिटेल्स सामिल करण्यात आले आहेत. हे प्रमाणपत्र वाहन मालकांना डिजीटल रुपात उपलब्ध होईल आणि ते 2 वर्षांसाठी वैध असणार आहे.

( हेही वाचा चहा- काॅफीचे व्यसन जरा कमी करा, कारण )

अन्यथा फेल ठरणार

वाहन स्क्रॅपिंग  अंतर्गत 10 वर्ष जुन्या डिझेल कार आणि 15 वर्ष जुन्या पेट्रोल कार स्क्रॅप करण्याचा नियम करण्यात आला आहे, जो वाहनांच्या फिटनेसवर अवलंबून आहे. या 10 आणि 15 वर्षांच्या कालावधीनंतरही वाहन मालक गाडीचा वापर करू इच्छित असल्यास, त्यांना वाहनाचं फिटनेस प्रमाणपत्र बनवणे अनिवार्य आहे. यात जर तो फेल झाला, तर ते स्क्रॅप केलं जाणार आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.