स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या (Swatantryaveer Savarkar Rashtriya Smarak) वतीने देण्यात येणारा ‘स्मृतीचिन्ह पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार कालातीत आणि तितकेच प्रभावी आहेत. या विचारांचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या व्यक्तीला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतीचिन्ह पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येते. स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या १४२व्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षीही पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. (Swatantryaveer Savarkar Rashtriya Smarak)
वीर सावरकरांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करणाऱ्या व्यक्ती वा संस्थेसाठी दिला जाणारा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतीचिन्ह पुरस्कार – २०२५’ हा या वेळी डॉ. विजय जोग आणि वैद्य चिंतामण साठे यांना घोषित झाला आहे. डॉ. विजय सखाराम जोग (Dr. Vijay Sakharam Jog) यांनी वयाच्या बाराव्या वर्षापासून राजकारण आणि साहित्यकारण आरंभले. ज्येष्ठ लेखक आणि अमोघ व्याख्याते म्हणून ते ओळखले जातात, तर वैद्य चिंतामण साठे हे सावरकरांच्या विचारांच्या प्रसाराचे काम आत्मीयतेने करत आहेत. स्मृतीचिन्ह, मानपत्र आणि २५,००० रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. (Veer Savarkar)
डॉ. विजय जोग यांचा अल्प परिचय
डॉ. विजय सखाराम जोग यांचा जन्म नागपूर येथे २२ जानेवारी १९४५ या दिवशी झाला. त्यांचे वडील डॉ. कॅप्टन सखाराम जोग हे सैन्यात वैद्यकीय अधिकारी होते. आई सरलाबाई (पूर्वाश्रमीच्या कुंदाताई घाणेकर) यांना देशविख्यात विश्वनाथराव केळकर आणि सावरकर त्रिवगीचा माहेरपणाचा वारसा मिळाला. त्यामुळे लढाऊ बाणा आणि देशभक्ती यांचे संस्कार विजयरावांवर लहानपणापासूनच झाले. त्यांचे शालेय शिक्षण नागपूरच्या प्रख्यात न्यू इंग्लिश हायस्कूलच्या मुख्य शाखेत झाले. तेथेही त्यांच्यावर संघाचे घोषप्रमुख बाबाजी सालोडकर आणि क्रांतीकार्याचे अभ्यासक खडक्कर गुरुजी यांनी समाजसेवेचे संस्कार केले. तेथे अल्पकाळासाठी शिक्षक असलेले विक्रम सावरकर यांनीही विजयरावांवर समाजसेवेचे संस्कार केले.
विक्रमरावांचे आणि विजयरावांचे संबंध एवढ्यापुरते मर्यादित नव्हते. दोघे ही सख्खे मावसभाऊ होते. विक्रमरावांच्या प्रज्वलंत साप्ताहिकातून- वि. स. जोगांनी चित्रपटविषयक लेखन केले. पुढे या बीजलेखनाची ‘अभिनयसम्राज्ञी मीनाकुमारी’, ‘सौंदर्यसम्राज्ञी मधुबाला’, ‘अशी गाणी अशा आठवणी’, ‘रूपेरी इतिहासाची सोनेरी पाने’ अशा चार अत्यंत लोकप्रिय पुस्तकांत मांडणी झाली.
डॉ. वि. स. जोग यांचे महाविद्यालयीन शिक्षण नागपूरच्या हिस्लॉप महाविद्यालयात झाले. एम. ए. मराठीच्या परीक्षेत ते गुणवत्तायादीत आले. त्यांनी सुमारे छत्तीस वर्षे मराठीचे अध्यापन नागपूरच्या सि. पी. अँन्ड बेरार महाविद्यालयात केले. तेथूनच ते प्राचार्य म्हणून निवृत्त झाले.
वयाच्या बाराव्या वर्षापासून त्यांनी राजकारण आणि साहित्यकारण केले. त्यांनी संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन, आदिवासी विणकर समाज आंदोलन, ते थेट पंजाबमधील उग्रवाद्यांविरुद्ध साम्यवाद्यांनी चालवलेल्या जनजागृती आंदोलनातही सहभाग दिला. पंजाबमधील दहशतवाद्यांविरुद्ध त्यांनी ‘संहार’ कादंबरी लिहिली. त्यांच्या ‘आई’, ‘आम्ही’, ‘ग्रीष्मदाह’, ‘मकरंद मुमताज’ या कादंबर्यांनीही प्रचंड वाचकप्रियता मिळवली.
त्यांच्या समीक्षालेखनामुळेही केवळ महाराष्ट्रात नव्हे, तर देशात ते विचारवंत समीक्षक म्हणून ओळखले जातात. त्यांना वर्ष १९८३ मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरचा सोविएत देश ‘नेहरू पुरस्कार’ मिळाला. मार्क्स, आंबेडकर आणि सावरकर यांचा समन्वय साधणारे ते भारतातील एकमेव साहित्यिक आहेत. ‘सावरकर-आंबेडकर विचार समीक्षा’ या पुस्तकात त्या समन्वयाचे प्रतिबिंब पडले आहे.
आचार्य अत्रे, पु. भा. भावे या दोघांचेही ते शिष्य आहेत. म्हणूनच त्यांचे ‘दोन झुंजार साहित्यकार : अत्रे आणि भावे’ हे पुस्तक खूप गाजले. त्यांच्या प्रचंड लेखनामुळे ‘विदर्भ साहित्य संघाचा’ प्रतिष्ठेचा ‘जीवनव्रती पुरस्कार’ त्यांना वर्ष २०१७ मध्ये देण्यात आला. वर्ष २०२२ मध्ये ‘विदर्भ साहित्य संमेलना’च्या चंद्रपूर येथे झालेल्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते.
कथा, संग्रह, कादंबर्या, नाटके, आत्मचरित्र इत्यादी त्यांची ३८ पुस्तके आजतागायत प्रसिद्ध झाली आहेत. महाराष्ट्रातील ते एक झुंजार, अमोघ वक्ते आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ते कृतीशील भाष्यकार आहेत. सावरकरांविषयी विदर्भात त्यांनी ५०० भाषणे केली आहेत. विक्रम सावरकरांच्या नेतृत्वाखाली त्यांनी नागपुरात स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा समिती स्थापन केली आहे. २५ मे १९८३ या दिवशी समितीतर्फे शंकरनगर येथे सावरकरांचा पुतळा उभारण्यात आला, त्यात जोग यांचा सिंहाचा वाटा होता. वर्ष २०१८ नागपूरमध्ये भरलेल्या पहिल्या स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाचेही (Swatantryaveer Savarkar Sahitya Sammelan) ते अध्यक्ष होते.
वैद्य चिंतामण साठे यांचा परिचय
वैद्य चिंतामण नारायण साठे यांचा जन्म ८ ऑगस्ट १९४७ या दिवशी झाला. (Vaidya Chintaman Narayan Sathe) १९७२ साली पुणे आयुर्वेद महाविद्यालयातून त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. आता वैद्य म्हणून शीव (मुंबई) येथे अध्यापनाचे कार्य करतात. ते उत्तम वक्ते असून तबलावादनात प्रवीण आहेत. त्यांचे वडील नामांकित वेद्य व हिंदुत्वनिष्ठ. तीच परंपरा चिंतामण साठे यांनीही पुढे चालविली. लहानपणी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जात असत. १९६४ पासून पुणे हिंदुसभेचे कार्य करू लागले. १९६७ पासून हिंदुसभेचे पदाधिकारी झाले. ते बोरिवली हिंदुसभेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. १९३७ नंतरच्या काळात हरि भास्कर भिडे, लक्ष्मण गोपाळ सहस्रबुद्धे, गोपाळराव गुत्ती, नथुराम विनायक गोडसे, नारायण दत्तात्रेय आपटे, सुंदराताई भोपटकर, वासुदेव वळवंत गोगटे, सौ. शांताबाई गोखले, ताराबाई जोशी, जयंतराव टिळक, गोपाळराव गोडसे, सौ. सिंधुताई गोडसे, सौ. पुष्पलताबाई खरे, श्रीमती लक्ष्मीबाई महाजन, श्रीमती उषाताई खेर, असिलता गोडसे, वि.पं. भोपळे, नरुभाऊ गोखले, जयरामबोवा नारगोळकर, गिरिजाबाई गोरे, सौ. जानकीबाई जोशी, बबनराव मोडक, शिवराम विष्णु मोडक, चितामण नारायण साठे, विश्वासराव डावरे, पु.वि. डावरे वकील, रा.स. भट, दा.वा. गोडबोले, का.म. महाजन, सफई वकील, सोमनाथ बाळशेट होनराव, न.गो. उपाख्य भाउराव अभ्यंकर, सौ. सुधाताई आफळे, बजरंग चौधरी, ठाकूरदेसाई इत्यादी मंडळींनी हिंदू महासभेच्या कार्यात भाग घेतला आहे. आजही कित्येक जण हिंदु महासभेचे कार्य सक्रीयपणे करत आहेत.
वैद्य चिंतामण साठे हे २००७ पासून स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कार्यकारिणीत आहेत. ते सावरकरांच्या विचारांच्या प्रसाराचे काम आत्मीयतेने करतात. ते आयुर्वेद विज्ञान मंडळ, मुंबई या संस्थेत २००५-२०१५ पर्यंत कार्यरत होते. मालाड ब्राह्मण सभेचे सक्रीय कार्यकर्ते आणि अध्यक्ष म्हणून अनेक वर्षे त्यांनी काम केले. केंद्र शासनाच्या वतीने धनत्रयोदशी, धन्वंतरी जयंती ही ‘राष्ट्रीय आयुर्वेद दिन’ म्हणून साजरी केली जाते. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये तो साजरा करण्यात त्यांचा मोलाचा सहभाग असतो. वैद्य साठे यांच्या अध्यक्षतेखाली स्मारकामध्ये आयुर्वेद निदान चिकित्सा केंद्र सुरु करण्यात आले आहे. येथे जनसामान्यांसाठी आयुर्वेद निदान चिकित्सा शिबिरे घेतली जातात.
याआधी सन्मानित करण्यात आलेले मान्यवर
यापूर्वी सावरकर चरित्राचे लेखक मामाराव दाते, पुण्याचे महापौर गणपतराव एम. नलावडे, मेजर प्रभाकर बी. कुलकर्णी, प्रख्यात दिग्दर्शक प्रेम वैद्य, लेखक व राजकारणी वासुदेव नारायण उत्पात, लेखक व दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, विद्याधर जयराम नारगोळकर व इतर मान्यवरांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतीचिन्ह पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आलेले आहे. (Veer Savarkar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community