मॉरिशसमध्ये वीर सावरकरांच्या पुतळ्याचे २८ मे रोजी अनावरण

161
मॉरिशसमध्ये वीर सावरकरांच्या पुतळ्याचे २८ मे रोजी अनावरण
मॉरिशसमध्ये वीर सावरकरांच्या पुतळ्याचे २८ मे रोजी अनावरण

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे तेजस्वी विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचावे, त्यांचे कार्य अव्याहतपणे सुरू राहावे, यासाठी दरवर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर विश्व संमेलन आयोजित केले जाते. यावर्षी हे संमेलन मॉरिशस येथे स्वातंत्र्यवारी सावरकरांच्या जयंतीनिमित्त २८ मे २०२३ रोजी होणार आहे. यादिवशी मॉरिशसच्या राजधानीत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण मॉरिशस येथे होणाऱ्या या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

मॉरिशसचे राष्ट्रपती पृथ्वीराज सिंह रूपन आणि उपपंतप्रधान लीलादेवी डुकन लच्छुमन यांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण या कार्यक्रमासाठी विशेष आमंत्रित म्हणून उपस्थित राहणार असून, महाराष्ट्रातून असंख्य वीर सावरकर भक्त या अपूर्व सोहळ्यासाठी मॉरिशसमध्ये दाखल होणार आहेत.

(हेही वाचा – मार्सेलिस येथे उभारण्यात येणाऱ्या वीर सावरकर स्मारकासंदर्भात राहुल नार्वेकरांनी अमित शहांची घेतली भेट)

महाराष्ट्र आणि मॉरिशसमध्ये रस्ते विकास, पायाभूत सुविधा, गुंतवणूक याबाबत मंत्री चव्हाण विविध स्तरांवर भेटीगाठी घेणार असून दोहोंमध्ये परस्पर सहकार्य करण्यावर त्यांचा भर असणार आहे. मॉरिशस म्हणजे चहूबाजूंनी हिंदी महासागराने वेढलेले पाचूचे बेट असून निसर्गाने मुक्त उधळण केलेले पर्यटन स्थळ आहे. सागरी जैव विविधता आणि पारदर्शक स्फटिकासारखे निळेशार पाणी व सुंदर स्वच्छ समुद्रकिनारे अनुभवणे असा सुवर्णयोग जुळून आल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.