Veer Savarkar : सद्यस्थिती आणि सावरकर विचार

Veer Savarkar :     सावरकरी विचार पुन्हा या पहलगाम हल्ल्यानंतर आधोरेखित होतात. कारण सावरकरां(Veer Savarkar)नी त्या काळात केलेल्या मागणीनुसार आज आपण सज्ज आणि दक्ष होतो. आधुनिक शशास्त्रे व तंत्रज्ञान, युद्धनीती, चाणक्ष आणि प्रभावशाली धोरण असल्याने पाकिस्तानचे हल्ले आपण हवेतच सहज संपुष्टात आणून सावरकरां(Veer Savarkar)च्या विचारांचे अनुकरण करून सामान्य भारतीय नागरिकांचे जीव वाचवू शकलो.

46

Veer Savarkar :     सावरकरी विचार पुन्हा या पहलगाम हल्ल्यानंतर आधोरेखित होतात. कारण सावरकरां(Veer Savarkar)नी त्या काळात केलेल्या मागणीनुसार आज आपण सज्ज आणि दक्ष होतो. आधुनिक शशास्त्रे व तंत्रज्ञान, युद्धनीती, चाणक्ष आणि प्रभावशाली धोरण असल्याने पाकिस्तानचे हल्ले आपण हवेतच सहज संपुष्टात आणून सावरकरां(Veer Savarkar)च्या विचारांचे अनुकरण करून सामान्य भारतीय नागरिकांचे जीव वाचवू शकलो.

देशाच्या सीमा चरख्याच्या सुताने नव्हे तर तलवारीच्या टोकानेच आखाव्या लागतात… – हिंदुहृदयसम्राट, प्रत्येकाच्या मनातील भारतरत्न, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

राष्ट्राच्या नि:शस्त्र, निष्पाप, सामान्य नागरिकांवर अचानक हल्ले होतात आणि त्यांची त्यात निर्घृणपणे हत्या केली जाते आणि आपण अशा पाकिस्तान बरोबर अजून किती दिवस शांततेच्या मार्गाने मैत्रीचा हात पुढे करत आपलेच एक पाऊल मागे टाकत रहायचे?

सिंहाची झेप घेत शत्रूला जबड्यात घेऊन त्याचा मुडदा पाडण्याची कुवत भारतीय सैन्यात असून सुद्धा काही जागतिक किंवा अंतर्गत राजकीय दबावामुळे अजून अशी दशकानुदशके एकेक पाऊल आपणच मागे टाकत शत्रूला नेहमीच सुधारण्याची संधी देत आलो. एकेक मागे पडणाऱ्या पावलागणिक एकेक पावलांचा आपल्या मातृभूमीवरील आपला हक्क, आपल्या भूमीचा तुकडा आपणच दुसऱ्याच्याच मालकीचा करत आहोत. आपल्या मातृभूमीवरील आपण गमावलेला अधिकार पुन्हा मिळविण्यासाठी देशाच्या सीमारेषा या टोकदार शस्त्राने आखूनच आपली भूमी आपल्याला परत मिळवून अखंड हिंदुस्थान किंवा अखंड हिंदुराष्ट्र करता येईल.

हे सर्व मिळविण्यासाठी आज खरंच चरख्याचं चाक आपण फिरवत बसायचे की भगवान श्रीकृष्णच्या बोटातल्या सुदर्शन चक्राला गती द्यायची? हिंदूंनो, मुरलीधर श्रीकृष्णाची नाही तर चक्रधर श्रीकृष्णाची भक्ती करा असे त्या काळात सांगणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरां(Veer Savarkar)चे मत आजच्या काळातच नव्हे तर चिरकालापर्यंत लागू होणारे आहे. मनाला शांतता आणि हृदयात हर्ष उत्पन्न करणाऱ्या मुरलीच्या स्वरनादात बुडून अजून किती दिवस आपण आपले झाकून ठेवणार आहोत…? तो मधुर सुर आपल्या कानात घुमवत न ठेवता निष्पाप देशवासियांचा आक्रोश आणि त्यांच्या किंकाळ्या कधी ऐकणार आहोत…? त्या मुरलीमधून स्वर उत्पन्न करण्यासाठी तोंडाची वाफ फक्त त्या मुरलीमध्येच सोडून किती आणि कधी पर्यंत वाया घालवणार आहोत…? त्या काळी सावरकरांनी सांगितले होते की मुरलीधराची भक्ती करण्यापेक्षा आज चक्रधर श्रीकृष्णाची भक्ती करा… तो विचार आज पूर्णतः कसा लागू होतो याचा अनुभव नुकत्याच पाकिस्तान बरोबर झालेल्या युद्धातून तुम्हाला उमजला असेलच.

एखाद्या पक्षाचा किंवा एखाद्या नेत्याचा विरोध करता करता आपणच आपल्या देशाचा अन धर्माचा द्वेष कधी करायला सुरुवात केली, हे आज बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही. अशांना देव, देश अन् धर्मापेक्षा एखादा राजकीय पक्ष किंवा एखादा नेता प्रिय किंवा अप्रिय होतो. देश हिताचा निर्णय होत असेल तर त्याला पाठिंबा देणं हे प्रत्येक भारतीय नागरिकांचे कर्तव्य आहे. भले तुम्ही त्या नेत्याच्या विरुद्ध पक्षाला मतदान केलेले असो. आजचा राजकीय द्वेष एवढा खालच्या पातळीला गेला आहे की, देशहिताच्या निर्णयाचे स्वागत किंवा अहिताच्या निर्णयाचा विरोध बाजूला राहतो आणि त्या नेत्याच्या कधी जातीवर, व्यंगावर, आजारपणावर त्याच्या कुटुंबावर वैयक्तिक टीका आणि खिल्ली उडवली जाते.

सावरकरां(Veer Savarkar)नी गांधी व नेहरू यांच्या अल्पसंख्य अनुनयाचे राजकारण व अतिरेकी अहिंसा ह्यावर कठोर टीका जरी केली तरी ती टीका राष्ट्रहितासाठी व राजकीय टीका होती. १२ फेब्रुवारी १९४३ ला गांधींनी दिल्ली येथे २१ दिवसांचे उपोषण सुरु केले. तेव्हा सावरकरांनी काढलेल्या पत्रकात ‘गांधीजींचा प्राण हा नुसता त्यांचा नसून ती राष्ट्रीय मालमत्ता आणि संपत्ती आहे’ असा उल्लेख केला होता. ६ मे १९४४ रोजी ब्रिटिश सरकारने गांधींची आगाखान पॅलेसमधून सुटका केल्यावर सावरकरांनी पत्रक काढून त्यात ‘गांधींची उतारवयात ढासळत असलेली प्रकृती आणि झालेला तीव्र आजार लक्षात घेऊन सरकारने त्यांची सुटका केल्यामुळे संपूर्ण राष्ट्राला हायसे वाटत असल्याचे’ असे नमूद केले. टीका राजकीय असावी ह्यांचे भान भल्या भल्या राजकारणी लोकांना आणि बऱ्याच नागरिकांना देखील नसते. त्यामुळे लोकशाहीत विचारकलह असावा. पण, वैयक्तिक कलह नसावा हे सावरकरांचे अनुकरण आजच्या राजकारणी नेत्यांना एक आदर्श ठरेल.

एकीकडे पाकिस्तान तर दुसरीकडून चीनसारखा भारतावर कायम आग ओकायला टपलेला असताना पाकिस्तान बरोबरच चीन सारख्या देशाला अद्दल घडवण्यासाठी चिनी वस्तूंचा वापर जेवढ्या प्रमाणात कमी करता येईल तेवढा कमी करण्याचा प्रयत्न व्हावा. परदेशी मालावर बहिष्कार टाकण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी १९०५ साली केलेली विदेशी कपड्यांची होळीची धग आजही आहे. वाजपेयी सरकारच्या काळात ‘स्वदेशी हो, स्वदेशी रहो’चा दिलेला नारा याच सावरकरी विचारांवर होता. अब्जावधी लोकसंख्या असलेल्या देशाने एखाद्या देशाला आर्थिकदृष्ट्या मागे फेकायचे ठरविले, तर स्वातंत्र्यवीर सावरकरांची १२० वर्षांपूर्वीच्या स्वदेशी वस्तू वापरण्याच्या चळवळीचा विचार नि:शस्त्रपणे शत्रू देशाला नामोहरम करू शकतो, हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवे.

नुकताच एप्रिल २०२५ मध्ये दहशतवाद्याकडून झालेला पहलगाम येथील हल्ला आपल्याला काय सांगून जातो?, हेच सांगून जातो की, भारतीय सैन्याचे आधुनिकीकरण, शक्तिशाली बॉम्बचा शोध, नवनवीन अद्ययावत आधुनिक तंत्रज्ञान, शत्रूविरुद्ध आधुनिक युद्धनीतीचा वापर या सर्वांची मागणी १९५४ मध्ये करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर(Veer Savarkar) पुन्हा प्रकर्षाने आठवतात. सावरकरी विचार पुन्हा या पहलगाम हल्ल्यानंतर आधोरेखित होतात. कारण, सावरकरांनी त्या काळात केलेल्या मागणीनुसार आज आपण सज्ज आणि दक्ष होतो. आधुनिक शशास्त्रे व तंत्रज्ञान, युद्धनीती, चाणक्ष आणि प्रभावशाली धोरण असल्याने पाकिस्तानचे हल्ले आपण हवेतच सहज संपुष्टात आणून सावरकरांच्या विचारांचे अनुकरण करून सामान्य भारतीय नागरिकांचे जीव वाचवू शकलो.

यासाठी राष्ट्राची आजची स्थिती पाहता, आजच्या काळात राष्ट्राला तारून नेणारे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार प्रत्येकाने अंमलात आणायला हवेत.(Veer Savarkar)

श्रीनिवास विजय कुलकर्णी
( लेखक पुणे येथील स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. )

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.