Veer Savarkar : ‘सावरकर पुरस्काराने माझ्यावरील जबाबदारी वाढली’ – डॉ. सुहास जोशी

129
Veer Savarkar : ‘सावरकर पुरस्काराने माझ्यावरील जबाबदारी वाढली’ : डॉ. सुहास जोशी

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकतर्फे प्रदान करण्यात आलेल्या विज्ञान पुरस्काराने आपण भारावून गेलो आहोत, त्यामुळे चांगले काम असेच पुढे सुरू ठेवण्याची माझ्यावरील जबाबदारी आणखी वाढली आहे, असे मला वाटते. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नव्या मार्गांनी लोकांना प्रशिक्षित करण्याची प्रेरणा या पुरस्काराने मिळाली असून, माहिती आणि तंत्रज्ञानाचा वापर जनतेच्या विकासासाठी करण्याचा प्रयत्न राहील, असे मत आयआयटी इंदौरचे संचालक प्रा. डॉ सुहास जोशी यांनी व्यक्त केले. (Veer Savarkar)

सावरकर यांचे विचार कालातीत

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४१व्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. वीर सावरकर यांच्या आदर्श विचारांना अनुसरून स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तीला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य’ आणि ‘स्वातंत्र्यवीर सावरकर विज्ञान पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार कालातीत आणि तितकेच प्रभावी आहेत. या विचारांचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या व्यक्तीला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येते. (Veer Savarkar)

(हेही वाचा – Veer Savarkar : घरातून पाठिंबा मिळत असल्याने माझे हिंदुत्व अजुनही टिकून; विद्याधर नारगोळकर यांनी व्यक्त केली कृतज्ञता)

डॉ. जोशी यांचे यंत्रनिर्मिती क्षेत्रात योगदान

‘स्वातंत्र्यवीर सावरकर विज्ञान पुरस्कार- २०२४’ हा भारतीय राष्ट्रीय अभियांत्रिकी अकादमी (आय. एन. ए.)चे डॉ. सुहास जोशी यांना त्यांच्या यंत्रनिर्मिती क्षेत्रातील योगदानाबद्दल घोषित झाला असून मानपत्र, स्मृतिचिन्ह, रू. ५१,००० असे पुरस्काराचे स्वरूप आहे. रविवारी २५ मे २०२४ रोजी दादर येथील सावरकर स्मारक सभागृहात झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यात बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते डॉ. जोशी यांना विज्ञान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष प्रवीण दीक्षित, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, सावरकर स्ट्रॅटेजिक सेंटरचे प्रमुख ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्यासह, सावरकर विचार प्रसारक संस्थेचे विद्याधर नारगोळकर आणि ‘स्वातंत्र्यवीर’ चित्रपटाचे निर्माते, लेखक, अभिनेते रणदीप हुड्डा पुरस्कारप्राप्त मान्यवर उपस्थित होते. (Veer Savarkar)

सावरकर यांचे योगदान अमूल्य : डॉ. जोशी

डॉ. जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पुरस्कार मिळाल्याबद्दल सावरकर स्मारकाचे आभार मानले. तसेच निवड समितीने आपल्याला डॉ. विजय भाटकर, डॉ. जयंत नारळीकर, डॉ. अनिल काकोडकर अशा आदर्श व्यक्तिमत्व आणि वैज्ञानिकांच्या श्रेणीत नाव जोडल्याबद्दल डॉ. जोशी यांनी कृतज्ञता व्यक्त केली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी कला, संगीत आणि साहित्यात दिलेल्या अमूल्य योगदानासोबतच राष्ट्रासाठी आणि समाजासाठी केलेल्या अग्रेसर सेवेबद्दल, मी त्यांना नमन करतो, असे सांगून यापूर्वीही स्मारकाने समाजासाठी असे असंख्य कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. (Veer Savarkar)

प्रवीण दीक्षित यांनी मानले आभार

कार्यक्रमाच्या शेवटी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष प्रवीण दीक्षित यांनी प्रमुख पाहुणे, पुरस्कार विजेते आणि पुरस्कार निवड समितीचे सदस्य, विज्ञान पुरस्कार निवडीसाठी डॉ. अमोल गोखले आणि शौर्य पुरस्कार निवडीसाठी ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचेही दीक्षित यांनी आभार मानले. (Veer Savarkar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.