Veer Savarkar : भारताची युद्धजन्य स्थिती आणि सावरकरांचे सैनिकी धोरण

भारत आणि त्याचे सैनिकी धोरण कसे असावे याविषयी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील कुठल्या नेत्याने कालतीत विचार मांडले असतील तर ते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Veer Savarkar). त्यांचे विचार, त्यांची याबाबतची योजना ही आजही लागू पडते हीच त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष आहे.

64
Veer Savarkar : भारताची युद्धजन्य स्थिती आणि सावरकरांचे सैनिकी धोरण
  • ब्रिगेडियर (निवृत्त) हेमंत महाजन

किती धाडिले अर्ज त्या नेदरांनी।
बहु प्रार्थिले शत्रू भिक्षेश्वरांनी।
तधीं काय तद्राज्य झोळीत आलें।
रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळालें?

स्वातंत्र्यकवी गोविंद यांच्या या काव्यपंक्ती या संघर्षाची अपरिहार्यता दाखवतात.

भारत आणि त्याचे सैनिकी धोरण कसे असावे याविषयी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील कुठल्या नेत्याने कालतीत विचार मांडले असतील तर ते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Veer Savarkar). त्यांचे विचार, त्यांची याबाबतची योजना ही आजही लागू पडते हीच त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष आहे. सध्या भारत एका संक्रमणाच्या काळातून जातोय. एकीकडे भारत आपल्या परंपरागत शत्रुला समर्थपणे दणका देतोय, तर दुसरीकडे भारतीय अर्थव्यवस्था प्रगतीची नवी शिखरे गाठतो आहे. या अशा संक्रमणाच्या काळात भारताला सावरकरांच्या सैनिकीकरणाचे विचार जास्त उपयोगी पडतील. सावरकरांनी त्यांच्या सबंध हयातीत सैनिकीकरणाचे महत्त्व सांगितले. तरीही सावरकरांचे (Veer Savarkar) सैनिकीकरण आंधळेपणाचे नव्हते. त्यांनी कधीच शस्त्र स्पर्धा, शस्त्रास्त्र स्पर्धेला उत्तेजन अशा गोष्टींचा पुरस्कार केला नाही. तर नागरिकांच्या सहभागाशिवाय भारताचे सक्षमीकरण व्यर्थ आहे असे त्यांचे मत होते. भारताच्या प्रत्येक नागरिकाने आपल्या देशाच्या संरक्षणासाठी, देशाला सामर्थशाली बनवण्यासाठी आपले योगदान देणे गरजेचे आहे. दुर्देवाने आजपर्यंतच्या कुठल्याही राजवटीने या दिशेने आपल्या समाजाचे प्रबोधनच केलेले नाही. सुरुवातीच्या काळात भारत हा काँग्रेसच्या हिंदी, चीनी – भाई, भाई, भारत हे एक अहिंसेच्या मार्गावर चालणारे राष्ट्र आहे. त्याला सैन्याची गरजच काय? असे प्रश्न विचारले जात होते. परंतु लवकरच भारताला एक जोरदार तडाखा बसला आणि भारताला परत समर्थ सैनिकीकरणाकडेच वळावे लागले.

(हेही वाचा – दापोली नगरपंचायतीत सत्तांतराचा स्फोट! Yogesh Kadam यांची रणनीती यशस्वी; कृपा घाग नगराध्यक्षपदी जवळपास निश्चित)

चीन विरुद्धच्या युद्धात भारताचा पराभव हा भारताच्या आतापर्यंतच्या धोरणाचे मोठे अपयशच होते. तेव्हा भारताला आपण सैनिकी पातळीवर किती कमजोर आहोत याची जाणीव झाली. परंतु भारतीय जनता मात्र त्या युद्धज्वराने भारुन गेली. राष्ट्राचे संकट त्यांना आपले वाटायला लागले. इथेच सावरकरांचे विचार जिंकले होते. भारत सरकारने त्यातून योग्य तो धडा घेत, आपल्या सैन्याच्या मजबुतीकडे, सैन्याच्या आधुनिकीकरणाकडे, निरनिराळ्या संरक्षक अस्त्रांची निर्मिती करणे याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. यानंतर भारताने आपल्यावर होणाऱ्या प्रत्येक आक्रमणाचा समर्थपणे मुकाबला केला. मग ते १९६५, १९७१, १९९९ चे युद्ध या सर्व युद्धांत भारताने शत्रुचा समर्थपणे मुकाबला केला. या सर्व युद्धांच्या वेळी भारतीय जनतेचाही पाठिंबा सैनिकांना होता. त्यामुळेच भारत विजय प्राप्त करु शकला. युद्धजन्य परिस्थितीत, युद्ध सुरु असताना कसे वागावे याचे प्रशिक्षण आता भारतीय जनतेला मिळाले आहे. तरीही सावरकरांचे विचार अभ्यासले की आपल्याला कळते सावरकरांचे विचार अजूनही काही सांगतात जे भारतीय जनतेने आचरणात आणणे गरजेचे आहे.

(हेही वाचा – “सरदार पटेल पीओकेसाठी आग्रही होते, पण…”; PM Narendra Modi यांचे मोठं विधान)

भारतीय नागरिकाने हा विचार केला पाहिजे की युद्धजन्य परिस्थितीतच किंवा युद्ध सुरु असतानाच देशभक्ती, देश महत्त्वाचा अशी भावना ठेवायची, काही दिवस देशप्रेमाचा जागर करायचा आणि परत सगळं नीट झालं की सगळं विसरुन जायचं हे सावरकरांना (Veer Savarkar) अपेक्षित नाही. नागरिकांनी कायम देशभक्ती, संविधानिक मुल्ये, रोजच्या जगण्यातसुद्धा अंमलात आणावीत. अगदी साध्या साध्या गोष्टींमधून याची सुरुवात होते. आपण भारतीय कायमच कायदा मोडण्याकडे सहज ओढले जातो. परंतु हे कायदे आपल्यासाठीच आहेत, आपल्या सुरक्षेसाठी आहेत, ते जर पाळले, व्यवस्थित पाळले तर आपलाच फायदा होतो. या सगळ्यातून पळवाटा शोधण्यासाठी आपण सहज लाच देण्याचा पर्याय अवलंबतो. त्यातून आपण काळ्या पैशालाच उत्तेजन देत आहोत हे त्यावेळी आपल्या गावीच नसते तर हे नेमके सावरकरांच्या विचारांच्या विरोधात आहे. यापुढची गोष्ट म्हणजे, समाजाला घातक ठरु शकणारी कुठलीच गोष्ट आपल्याला करायची नाही, समाजातील समाजविघातक गोष्टींना पाठिंबा द्यायचा नाही, आपल्याला त्याची माहिती मिळाली की लगेच ती पोलिसांना देणे, त्यातून कुठलीही अनुचित घटना घडणार नाही याची काळजी घेणे. या सर्व नागरिक म्हणून आपल्या जबाबदाऱ्या आहेत. आपल्या रोजच्या जगण्यात सर्व प्रकारच्या गोष्टींचा उपभोग घ्यायला पाहिजे परंतु त्याचा राष्ट्राला अपाय होणार नाही याची काळजी घ्यावी. या सर्व गोष्टी सावरकरांच्या विचारसरणीतूनच आपल्याला शिकायला मिळतात. सावरकरांचे दैवत असलेल्या शिवाजी महाराजांच्या चरित्रातील एक उदाहरण देतो. शिवरायांनी अफझलखानाचा वध केला, डोंगरा एवढ्या शत्रुला मुठभर सहकाऱ्यांनीशी पराभूत केले. हे सर्व शक्य झाले ते फक्त शूर सैनिक आणि तितक्यात सजग, स्वामीनिष्ठ प्रजेची साथ होती म्हणूनच. तोच धडा प्रत्येक भारतीयानी गिरवला पाहिजे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.