Veer Savarkar : ‘अंदमानात त्यांचा आत्मा माझी वाट पाहात आहे’, अभिनेता रणदीप हुड्डा भावना व्यक्त करताना म्हणाला…

यावेळी रणदीप हुड्डा यांनी आपल्या भाषणाची सुरुवात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 'ने मजसी ने परत मातृभूमीला' या गाण्याने केली.

87
Veer Savarkar : 'अंदमानात त्यांचा आत्मा माझी वाट पाहात आहे', अभिनेता रणदीप हुड्डा भावना व्यक्त करताना म्हणाला...

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४१व्या जयंतीनिमित्त रविवार, २६ मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य, विज्ञान, समाजसेवा, स्मृतीचिन्ह पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार वितरण सोहळा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता. बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर हे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार-२०२४’ सोहळ्याचे प्रमुख पाहुणे होते. (Veer Savarkar)

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटात विनायक दामोदर सावरकर यांची भूमिका साकारणारे अभिनेता रणदीप हुड्डा यांना यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी वीर सावरकरांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता रणदीप हुड्डा यांचा गणपतीचे शस्त्र ‘परशू’ देऊन गौरव करण्यात आला. (Veer Savarkar)

मला ‘हे’ करावे लागेल, असं वाटलं नव्हतं
यावेळी रणदीप हुड्डा यांनी आपल्या भाषणाची सुरुवात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ या गाण्याने केली. यावेळी त्यांनी वीर सावरकर यांच्याविषयी आणि चित्रपटाविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, “जेव्हा मी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटासाठी अभ्यास करण्यास सुरुवात केली, तेव्हा मला त्यांच्याबद्दल जेवढी माहिती असायला हवी तेवढी नव्हती. मला वाटलं नव्हतं की, मला वजन कमी करावे लागेल आणि काळ्या पाण्याला जावे लागेल. लोक काळ्या पाण्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करायचे आणि आज मी त्यांच्या जयंतीनिमित्त काळे पाणी असलेल्या ठिकाणी वेळेवर पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. (Veer Savarkar)

रागाच्या भरात चित्रपट बनवला…
“या चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान मला हे जाणून आश्चर्य वाटले की, त्यांचे लेखन, त्यांनी देशासाठी केलेल बलिदान, सर्वच क्षेत्रातील त्यांचे योगदान, त्यांचे जीवन जे देशप्रेमाच्या ध्येयाने प्रेरित आहे. आजपर्यंत त्यांचा खरा इतिहास लाखो भारतीयांपर्यंत का पोहोचला नाही? तो का लपवला गेला? या रागाच्या भरात मी हा चित्रपट बनवला. जेणेकरून त्यांचे शब्द, त्यांचे विचार, त्यांचे जीवन लोकांपर्यंत पोहोचेल. ते एक महान लेखक, समाजसुधारक आणि नवीन युगातील विचारवंत व्यक्ती होते. मी बनवलेला चित्रपट लोकांना आवडला आणि जेव्हा जेव्हा मी गुप्तपणे चित्रपट पाहण्यासाठी जायचो, तेव्हा चित्रपट संपल्यानंतर प्रेक्षकांना उभे राहून टाळ्या वाजवताना पाहून मनोमन त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त होत असे. हा चित्रपट त्यांच्या जयंतीनिमित्त २८ मे रोजी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे, कारण त्यांच्यावर आधारित असलेला हा चित्रपट त्यांच्या जयंतीदिनी प्रदर्शित व्हावा, असा माझा आग्रह होता. “अंदमानात त्यांचा आत्मा माझी वाट पाहत आहे”, असे म्हणून त्यांनी आपल्या भाषणाचा शेवट केला. (Veer Savarkar)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.