Hanuman Stotra : हनुमान स्तोत्राचे काय आहे महत्व? का करावे याचे पठण?

443

देशासह जगाच्या कानाकोपऱ्यात जिथे जिथे मराठी कुटुंब आहे, त्यांच्या घरामध्ये श्री हनुमानाची आरती आणि मराठी भाषिक घरामध्ये गायले जाणारे मारुती स्तोत्र (Hanuman Stotra) हे श्री समर्थ रामदास यांनी रचलेले मारुतीरायाचे गुण वर्णन करणारे आणि स्तुतिपर स्तोत्र  आहे. 17व्या शतकात हे स्तोत्र लिहिले गेले आहे. या स्रोताचे पठण केल्याने शनी महादशेपासून संरक्षण मिळते, त्यामुळे विशेष करून साडेसातीच्या वेळी मारुती स्रोताचे पठण केले जाते.
‘भीमरूपी महारुद्रा, वज्र हनुमान मारुती…’ या पंक्तीने मारुती स्तोत्राची सुरुवात होते.

मारुती स्तोत्र शक्तीचा संदेश

खरंतर मारुती स्तोत्राची (Hanuman Stotra) अनेक रूपे आहेत. मात्र त्यातील श्री रामदास स्वामींनी लिहिलेले स्तोत्र विशेष करून प्रसिद्ध आहे. समर्थ रामदास स्वामींनी महाराष्ट्रात 11 ठिकाणी मारुती मंदिरे स्थापन केली. त्या काळात मोठ्या भूभागावर मुघलांची सत्ता होती आणि अशावेळी लोकांना शक्तीची उपासना शिकवण्याची गरज निर्माण झाली होती. याकरता समर्थ रामदास स्वामींनी हनुमानाचे स्तोत्र (Hanuman Stotra) लिहिले, असे विचारवंत सांगतात. आपण मारुती स्तोत्राच्या सुरुवातीच्या ओळी पाहू. आपल्या सहज लक्षात येते की, यात शक्तीचा संदेश देण्याचा प्रयत्न संत रामदास स्वामींचा आहे.

(हेही वाचा भारताची सागरी सीमा झाली अधिक मजबूत; स्वदेशी युद्धनौका INS Imphal ची क्षेपणास्त्र चाचणी यशस्वी)

भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती |

वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ||१||

महाबळी प्राणदाता, सकळां उठवी बळें |

सौख्यकारी दुःखहारी, दुत वैष्णव गायका ||२||

महाराष्ट्रात प्रामुख्याने मारुती स्तोत्राचे (Hanuman Stotra) पठण होत असल्याचे दिसून येते. आपण जसजसे उत्तरेकडे जातो, तसतसे हनुमान चालिसा पठण होताना दिसते. महाराष्ट्रात मारुती स्तोत्र घराघरात लहान मुलांना शिकवले जाते. ‘सुखकर्ता दुःखहर्ता…’ या गणपतीच्या आरतीप्रमाणे, ‘सत्राणे उड्डाणे…’ या हनुंमताच्या आरतीप्रमाणे समर्थ रामदास स्वामींनी मारुती स्तोत्रामध्ये सोप्या शब्दांची योजना केली आहे. मारुती स्तोत्र (Hanuman Stotra) सर्वांना कळेल अशा मराठीमध्ये त्यांनी लिहिले आहे. “मारुती किती विशाल आहे, भारदस्त आहेत, शूर, रक्षणकर्ते आहे याची प्रचिती स्तोत्रातून येते. मारुती असताना आपल्याला भीती नाही अशी जाणीव होते. शक्तीशाली असला तरी रामाचे दास्यत्व त्याने पत्करले आहे. मारुतीच्या याच गुणांमुळे आपल्यामध्ये सेवक भाव, दास्य भाव आणि लढाऊ वृत्तीही निर्माण होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.