कानपूर येथील फार्माक्युटिकल कंपनीत काम करणारा तरुण सहा महिन्यांपूर्वी ठाण्यात आला. ठाण्यातील रहिवासी संघात सदनिका भाड्याने घेत तरुणाने गुप्त रोग तसेच विविध आजारांच्या तातडीने निदान करणा-या कीट (रॅपिड टेस्ट कीट) विक्रीला ठेवल्या. विनापरवाना व्यवहार केलेल्या दस्तावेजाची अन्न व प्रशासनाला माहिती मिळाली आणि अधिका-यांनी थेट घरात धाड टाकून १२.४० लाखांचा माल जप्त केला.
( हेही वाचा : …तर २०१७च्या निवडणुकीप्रमाणे २२७ प्रभागांचे आरक्षण राहिल कायम?)
ठाण्यातील शिळफाट्यात निरजकुमार विश्वकर्मा या तरुणाने भारत इको विस्टा या इमारतील फ्लॅट भाड्याने घेतला. विविध आजारांचे तातडीने निदानाचे साहित्य तयार करणा-या हरियाणातील सिडॅक लाइफ केअर या कंपनीकडून होलसेलच्या दरात कीट्स विकत घेतले. सर्व किटचे साहित्य आपल्या शिळफाट्यातील फ्लॅटमध्ये त्याने आणले. घरातूनच निरजकुमार किट्सची विक्री करु लागला. या आजारांच्या किट्सची विक्री कोरोनासाठी एन्टीजन टेस्ट, एचआयव्ही, हेपेटायटीस, विषमज्वर, माणसाला शारिरीक संबंधानंतर होणारा सिफिलीस, तसेच पावसाळ्यात हमखास आढळून येणा-या डेंग्यू आणि मलेरिया या आजाराची रॅपिड टेस्ट किट्स विनापरवाना निरजकुमार विकत होता.
महाराष्ट्रासह परराज्यांतही विक्री
या किट्स विविध प्रयोगशाळा तसेच रक्तपेढ्यांमध्ये विकल्या जात होत्या. महाराष्ट्रासह कर्नाटक, तामिळनाडू आणि तेलंगणा राज्यात या किट्स रिटेलच्या किंमतीत विकल्या जायच्या.
कारवाईचे पथक –
अन्न व औषध विभागाचे गुप्तवार्ता विभागाचे औषध निरीक्षक वि.रा.रवी, अजय माहुले, ठाण्याचे औषध निरीक्षक अजय माहुले यांनी ही कारवाई केली.