Uddhav Thackeray : काँग्रेसच्या दिवंगत मुख्यमंत्र्याचा काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत अवमान

ही सभा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उबाठा शिवसेना या महाविकास आघाडीच्या वज्रमुठीची होती. यावेळी व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुंबई अध्यक्ष भाई जगताप अशी मंडळी होती.

138
Uddhav Thackeray : काँग्रेसच्या दिवंगत मुख्यमंत्र्याचा काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत अवमान

बिकेसीत महाविकास आघाडीच्या वज्र मूठ सभेत काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत शिवसेना (Uddhav Thackeray) (उबाठा) गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या दिवंगत मुख्यमंत्री यांचा उल्लेख चक्क नरभक्षक असा करत त्यांचा अवमान केला. काँग्रेसचे नेते एका बाजूला उद्धव ठाकरे यांची स्तुती सुमने गात असताना दुसरीकडे त्यांनी काँग्रेसच्या कार्यपध्दतीवर जोरदार टीका केली. पण त्यानंतर स्वाभिमान गहाण ठेवलेल्या काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना याबाबत माफी मागावी किंवा असे वक्त्यव्य पुन्हा करू नये अशी समज अथवा सूचना केली नाही.

(हेही वाचा – मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याची शरद पवारांची घोषणा)

महाराष्ट्रला मुंबई कशी मिळाली या संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा इतिहास सांगताना, उद्धव ठाकरे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच नरभक्षक असा उल्लेख केला… मोरारजी सारखा नरराक्षस तेव्हा सत्तेत. असे ते भाषणात म्हणाले. (Uddhav Thackeray)

ही सभा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उबाठा शिवसेना या महाविकास आघाडीच्या वज्रमुठीची होती. यावेळी व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुंबई अध्यक्ष भाई जगताप अशी मंडळी होती. त्यांच्या समक्ष उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांचा अशाप्रकारे उल्लेख केला तरी या नेत्यांनी आपल्या दिवंगत नेत्याचा, माजी मुख्यमंत्री यांचा अवमान सहन केला. दिल्लीतील तत्कालीन काँग्रेस सरकारच्या इशाऱ्यावरूनच तत्कालिक मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी पोलीस बळाचा वापर आणि आपला ताफा आंदोलकांच्या अंगावर नेत त्यांचे बळी घेतले होते. (Uddhav Thackeray)

हेही पहा – 

 

महाराष्ट्रला मुंबई मिळू नये ही भूमिका काँग्रेसच्या नेत्यांची होती. पण महाराष्ट्र दिनाच्या वज्र मूठ सभेत याची आठवण करून देत उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या कारनाम्याचा इतिहास जागा केला. यावर काँग्रेसचे नेते टाळ्या वाजवत दाद देत होते. (Uddhav Thackeray)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.