खबरदार! वाहतूक पोलिसांसोबत उद्धटपणे वागाल तर …

128

खबरदार! यापुढे वाहतूक पोलिसासोबत उद्धटपणे वागलं, तर तुमचे सर्व कृत्य थेट वाहतूक विभागाच्या नियंत्रण कक्षाला लाईव्ह दिसेल आणि तुमच्यावर  फौजदारी कारवाई होऊ शकते, कारण पुरावा म्हणून तुमचे सर्व कृत्य वाहतूक पोलिसांच्या छातीवर असलेला ‘बॉडी डिव्हाईस’ आपल्या कॅमेरात सर्व बंदिस्त होईल आणि तुमचे बोलणे देखील या डिव्हाईसमध्ये रेकॉर्ड होणार आहे. या डिव्हाईसचा दुसरा फायदा वाहन चालकाला देखील होणार असून वाहतूक पोलिस तुमच्यासोबत कसे वागतात ते देखील त्यात कैद होणार आहे.

१,३५० बॉडी डिव्हाईस खरेदी

मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने १,३५० बॉडी डिव्हाईस खरेदी केले आहे. हे डिव्हाईस मुंबईतील प्रत्येक वाहतूक विभागाला काही प्रमाणात वाटण्यात आलेले आहे. या डिव्हाइसमध्ये एक उत्तम दर्जाचा कॅमेरा आणि चांगल्या दर्जाचा माईक बसवलेला आहे. तसेच डिव्हाईसमध्ये एक सिम कार्ड असून या सिम कार्डच्या माध्यमातून याचे थेट प्रेक्षपण वाहतूक विभागाच्या नियंत्रण कक्षात लावण्यात आलेल्या टेलिव्हिजन संचावर दिसणार आहे. या डिव्हाईमुळे पोलिस आणि वाहन चालकामध्ये होणारे वाद थांबू शकता, या वादात नक्की चूक कुणाची आहे हे कळू शकते. संबंधित अधिका-यांनी सांगितले की, हाय-टेक उपकरणे गेल्या आठवड्यात कार्यान्वित करण्यात आली होती, ज्यामुळे ट्रॅफिक पोलिसांना रस्त्याची शिस्त लागू करण्यात आणि वाहनांच्या हालचालींवर नियमन करण्यात मदत होऊ शकेल. प्रत्येक कॅमेऱ्यातील प्र्त्येक क्षण  ट्रॅफिक मुख्यालयासोबत शेअर केले जातील. हे नियंत्रण कक्षाला वाहतूक कोंडी किंवा इतर कोणत्याही परिस्थितीबद्दल वेळेवर अपडेट देईल, त्यामुळे वाहतूक नियंत्रण कक्षाकडून  वेळेवर कारवाई करण्यात मदत मिळेल.

(हेही वाचा राष्ट्रपतींच्या रायगड दौऱ्यापूर्वी शिवप्रेमींचा विरोध, म्हणाले…)

रस्त्यावर शिस्त वाढणार

या डिव्हाइसमध्ये  मोबाईल फोनप्रमाणेच सिम कार्डसाठी स्लॉट आहे. एखादा ठिकाणी सक्रिय झाल्यानंतर, ते वाहतूक विभागाच्या ट्रॅकिंग ग्रिडशी ग्लोबल पो सिशनिंग सिस्टम (जीपीएस ) द्वारे संवाद साधण्यास सुरूवात करतात. व्हिडिओ कॉल प्रमाणेच, कॅमेरा, अधिकतर स्पष्ट दृश्यासाठी वाहतूक पोलिसांच्या छातीवर लावलेला असतो, वरळी येथील वाहतूक मुख्यालयाला थेट एचडी फीड पाठवण्यास सुरुवात करतो. ‘बॉडी कॅमेरे रस्त्यावरील शिस्त अधिक पारदर्शक पद्धतीने आणणार आहे, कारण आमची रस्त्यावर अधिक नजर असणार आहे आणि यामुळे रस्त्यावरील पोलिस आणि वाहन वापरकर्त्यांमधील वाद कमी होण्यास मदत होईल’, असे वाहतूक विभागाचे सहपोलिस आयुक्त राजवर्धन सिन्हा यांनी म्हटले आहे. सिन्हा पुढे म्हणाले की, ‘बर्‍याच प्रकरणांमध्ये आम्ही पोलिस आणि वाहनचालकांमध्ये जोरदार भांडणे पाहिली आहेत, त्यात काही वेळा शारीरिक हल्ले देखील होतात, मात्र नेमके काय घडले हे कोणालाच माहिती नसते, परंतु हे कॅमेरे आम्हाला घटनांची खरी माहिती मिळविण्यात मदत करतील आणि आम्हाला कारवाई करण्यास मार्गदर्शन करतील.’

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.