तब्बल एक शतकानंतर बुडालेलं जहाज सापडलं!

110

अंटार्क्टिकाच्या किनाऱ्यावर 107 वर्षांपूर्वी बुडालेल्या जहाजाचे अवशेष सापडले आहेत. हे जहाज एचएमएस एन्ड्युरन्स ध्रुवीय संशोधक अर्नेस्ट शॅकलटनचे यांचे होते. हे सापडलेले जहाजाचे अवशेष चांगल्या स्थितीत आहे. 1915 साली 9,842 फूट लांब असणारे हे जहाज अंटार्क्टिक जहाजाच्या दुर्घटनेनंतरसमुद्रात बुडाले होते. हे फॉकलंड बेटांच्या दक्षिणेस अंटार्क्टिकाच्या उत्तरेकडील किनारपट्टीसह दक्षिणेकडील महासागरातील एक पॉकेट असल्याचे सांगितले जात आहे.

ध्रुवीय इतिहासातील मैलाचा दगड

फॉकलँड्स मेरीटाईम हेरिटेज ट्रस्ट आणि हिस्ट्री हिटने 107 वर्षांपूर्वी बुडालेल्या जहाजाचे अवशेष शोधले आहे. मिशनचे एक्सप्लोरेशन डायरेक्टर मॅनसन बाऊंड यांनी सांगितले की, अशाप्रकारे लाकडी जहाजाची झालेली मोडतोड त्यांनी कधीच पाहिली नव्हती. यासह हे जहाज संवर्धनाच्या उत्कृष्ट स्थितीत आहे. त्यामुळे ध्रुवीय इतिहासातील हा एक मैलाचा दगड मानले जात आहे. ब्रिटिश संशोधक आयरिश शॅकलटन बराच काळ दक्षिण ध्रुवाचा शोध घेत होते. त्यांनी या भागात एकूण चार शोधमोहीम राबवल्या होत्या. एन्ड्युरन्स जहाज 1914 मध्ये ब्रिटनमधून निघाले आणि एका वर्षानंतर अंटार्क्टिकामधील मॅकमर्डो साउंडला पोहोचले. या शोध मोहीमेला इंपीरियल ट्रान्स-अंटार्क्टिक मोहीम असे नाव देण्यात आले. अत्यंत वाईट परिस्थितीमुळे हे जहाज वेडेल समुद्रात घनदाट आणि कडक बर्फात अडकल्याचे आढळून आले.

(हेही वाचा -चंद्रकांत दादा म्हणतायेत, “भाजपला पराभूत करणं म्हणजे भिंतीवर डोकं आपटणं”)

कोणतीही जीवितहानी न होता मोठा विजय

मिळालेल्या माहितीनुसार, या जहाजावर शॅकलटनसह 28 लोक होते. शॅकलटनने एन्ड्युरन्सला सोडून उत्तरेकडे तरंगणाऱ्या बर्फाच्या पृष्ठभागावर तळ ठोकला. हळूहळू ही टीम निर्जन एलिफंट बेटावर पोहोचली आणि या सर्वांची येथून सुटका करण्यात आली. मोहीम अयशस्वी झाली, परंतु टीमच्या बचावाच्या अनेक महिन्यांनंतर, शॅकलटनच्या नेतृत्वाला कोणतीही जीवितहानी न होता मोठा विजय म्हणून पाहिले गेले. अशाच आणखी एका मोहिमेदरम्यान, 1922 मध्ये दक्षिण जॉर्जिया बेटावर 47 व्या वर्षी शॅकलटनचा मृत्यू झाला आणि तेथेच त्याला दफन करण्यात आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.