नवरा आणि सासूच्या अत्याचाराला कंटाळून अखेर ‘तिने’ केली आत्महत्या

111
रायगड येथे राहणाऱ्या २२ वर्षीय तृप्ती अनंता पाटील यांनी नवरा आणि सासूच्या अत्याचाराला कंटाळून घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याने रायगडमध्ये खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी नवरा आणि सासूच्या विरोधात कलम ३०७, ४९८ अ, ३२३, ५०४, ५०६, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

मुलगी झाली म्हणून संसार झाले बंद 

तृप्ती अनंत पाटील यांचे आणि अनंता पाटील यांचे प्रेम संबंध होते, दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला मात्र चौकशीनंतर तृप्ती यांच्या आई आणि बहिणीला अनंताला दारूचे व्यसन असल्याचे समजल्याने त्यांनी विवाहाला विरोध केला, मात्र तरीही तृप्ती हिने अनंता याच्याशी विवाह केला. विवाह केल्यानंतर मात्र तृप्ती हिला तिच्या नवऱ्याकडून मारहाण सुरु झाली. शिवीगाळ होणे सुरु झाले. याला कंटाळून तृप्ती २ वेळा सासर सोडून माहेरी आली होती. काही दिवसांनी ती गरोदर झाली, तरीही सासरच्या लोकांकडून तिचा सांभाळ होत नव्हता, अखेर तिच्या प्रसूतीच्या वेळीही सासरच्या लोकांनी दुर्लक्ष केले, शेवटी तृप्ती एकटी रुग्णालयात गेली आणि तिथे तिची प्रसूती झाली, तिला मुलगी झाली, मुलगा न झाल्यामुळेही सासरच्या लोकांकडून तृप्तीला तू आता सासरी येऊच नको, असे म्हटले. मात्र माहेरच्या लोकांनी समजूत काढल्यावर तृप्ती पुन्हा सासरी गेली, त्यानंतरही तिच्यावर अत्याचार सुरु झाले. त्यामुळे अखेर तृप्तीने सासरच्या लोकांच्या अत्याचाराला कंटाळून २५ ऑगस्ट रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी तृप्ती हिची बहीण दीप्ती गणेश चव्हाण हिने तृप्तीचा नवरा आणि सासू हिच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली, त्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.