Tilak-Savarkar Memorial : डोंगरीत साकारणार ‘टिळक-सावरकर स्मृती स्मारक’; राज्य शासनाचा प्रस्ताव

राज्याच्या महिला आणि बालविकास विभागाने 'टिळक-सावरकर स्मृती स्मारका'साठी पुढाकार घेतला आहे. महिला आणि बालकांशी संबंधित अनेक उपक्रम येथे राबवले जाणार आहेत.

196
Tilak-Savarkar Memorial : डोंगरीत साकारणार 'टिळक-सावरकर स्मृती स्मारक'; राज्य शासनाचा प्रस्ताव
सुहास शेलार 

लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर (Tilak-Savarkar Memorial) यांनी ज्या डोंगरी कारागृहात शिक्षा भोगली, त्या परिसरात ‘टिळक-सावरकर स्मृती स्मारक’ साकारण्याचा प्रस्ताव राज्य शासनाच्या विचाराधीन आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यासंदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे.

मुंबईतील डोंगरी कारागृहात लोकमान्य टिळकांनी (Tilak-Savarkar Memorial) दोनवेळा शिक्षा भोगली. तेथे त्यांना ज्या कोठडीत ठेवण्यात आले होते, त्याच कोठडीत वीर सावरकरांनीही शिक्षा भोगली. वीर सावरकरांना दोनदा जन्मठेप, म्हणजेच ५० वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेच्या निर्णयाची बातमी ही डोंगरीच्या कारागृहात मिळाली होती. या कारागृहात शिक्षा भोगत असताना त्यांनी ‘सप्तर्षी’ काव्य रचले. डोंगरीच्या कारागृहात शिक्षा भोगत असताना, वीर सावरकर फिरण्यासाठी कारागृहाच्या आवारात यायचे तेव्हा आजुबाजुच्या इमारतीतील माणसे गोळा होऊन त्यांना अभिवादन करायची. टिळक-सावरकरांच्या अशा असंख्य आठवणी सर्वसामान्य नागरिकांना कळाव्यात, त्यातून त्यांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हे स्मृती स्मारक उभारले जाणार आहे.

(हेही वाचा – Municipal elections : मनपाच्या निवडणुका येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस)

या परिसरात पुरातन मंदिर आणि १०० वर्षे जुने झाड आहे. त्याला धक्का न लावता स्मृती स्मारकाची (Tilak-Savarkar Memorial) उभारणी केली जाणार आहे. हे स्मारक ३-डी तंत्रज्ञानावर आधारित असेल आणि ते सौरऊर्जेवर चालावे, अशी रचना केली जाईल. त्याशिवाय स्मारकाच्या आवारात दोन्ही महापुरुषांचे पुतळे उभारले जातील. टिळक आणि सावरकरांच्या जयंती-पुण्यतिथीला तेथे विशेष कार्यक्रम घेण्याचे विचाराधीन आहे, अशी माहिती उच्च पदस्थ सूत्रांनी दिली.

हेही पहा – 

बचत गटांच्या माध्यमातून प्रदर्शन

राज्याच्या महिला आणि बालविकास विभागाने ‘टिळक-सावरकर स्मृती स्मारका’साठी (Tilak-Savarkar Memorial) पुढाकार घेतला आहे. महिला आणि बालकांशी संबंधित अनेक उपक्रम येथे राबवले जाणार आहेत. शिवाय बचत गटांच्या माध्यमातून दोन्ही महापुरुषांचे साहित्य, विचार आणि त्यांच्याशी संबंधित गोष्टींचे प्रदर्शन भरवले जाणार आहे. या स्मारकासाठी मुंबई महानगरपालिकेकडून निधी मागण्यासंदर्भात चर्चा सुरू असल्याचे कळते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.