गडचिरोलीतील जंगलात प्रेमीयुगुलावर वाघाचा हल्ला

137

गडचिरोलीत मंगळवारी दुपारी वळसा जंगलात रोमान्स करणा-या प्रेमीयुगलावर वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात अमित नाखाडे (२१) तरुणाचा मृत्यू झाला. हल्ल्यात तरुणी थोडक्यात बचावली. तिने घटनास्थळावर पळून आरडाओरड केल्याने जवळच टेहाळणी करणा-या वनाधिका-यांनी अजितची वाघापासून सुटका केली. परंतु तोपर्यंत वाघाच्या हल्ल्यात अजितचा जीव गेला. या वाघाने यंदाच्या वर्षात तीन जणांना ठार केल्यानंतर वाघाला जेरंबद केले जाणार असल्याची माहिती गडचिरोली वनविभागाचे साहाय्यक वनसंरक्षक मनोज चव्हाण यांनी दिली.

( हेही वाचा : गिरणी कामगारांच्या घरांच्या किंमतीत होणार वाढ ? )

वनाधिका-यांची रेस्क्यू टीम दाखल

यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला भंडारा जिल्ह्यातील लाखानदूर येथे वाघाच्या हल्ल्यात पहिला बळी गेला. या जागेपासून पंधरा किलोमीटर अंतरावर गडचिरोली जिल्ह्यातील वळसा जंगलक्षेत्र येते. फेब्रुवारी महिन्यापासून कॅमेरा ट्रॅपमध्ये लाखानदूर येथील हल्लोखोर वाघ वनाधिका-यांना आढळून आला. १४ एप्रिल रोजी वळसा येथे या वाघाने केलेल्या हल्ल्यात इसमाचा हात आणि पाय खाल्ला होता. मात्र या घटनेनंतर तो गायब झाला होता. ब-याच दिवसांनी वनविभागाने लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये तो दिसला. तीन दिवसांपूर्वी वळसा जंगलात तो पुन्हा सातत्याने दिसून येत असल्याने सोमवारीच गडचिरोलीत नवेगाव नागझि-याची वनाधिका-यांची रेस्क्यू टीम दाखल झाली होती.

भंडा-यातील लाखानदूर येथील हल्ल्यानंतरही वनविभागाने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु वाघाने गडचिरोली येथे आपला मुक्काम वळवला. गेल्या तीन दिवसांपासून वळसा जंगलक्षेत्रात वाघ सातत्याने दिसून येत होता. या भागांत दुचाकी वनविभागाने बंद केल्या होत्या. सोमवारी रात्री वनविभागाच्या गाडीच्याही मागे वाघ लागला होता. वाघाला पकडण्यासाठी नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील वनाधिका-यांची टीम गडचिरोलीत दाखल झाली असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.