वर्सोव्यातील खारफुटींवर उभारलेल्या झोपड्या तोडल्या

139

वर्सोवा येथील खारफुटींवर उभारलेल्या ५१ झोपड्या वनविभागाच्या कांदळवन कक्षाने बुधवारी तोडल्या. पोलीस आणि महसूल विभागाच्या साहाय्याने ही कारवाई केली गेली. गेल्या काही वर्षांत वर्सोवा व जुहू किना-याला लागून असलेल्या खारफुटींवर अनधिकृतरित्या बांधकाम झाल्याची तक्रार वनाधिका-यांना मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. पर्यावरणप्रेमी झोरु बाथेना यांनी कांदळवन कक्षाकडे तक्रार नोंदवली होती.

पोलिसांच्या मदतीने कारवाई केली जाणार

तक्रारीची दखल घेत फेब्रुवारी महिन्यात वनाधिका-यांनी घटनास्थळी भेट दिली असता, अर्चना मोरे या महिलेने एक झोपडी उभारल्याचे दिसून आले. या भागांत अनेक झोपडपट्ट्या उभारल्या गेल्याचेही वनाधिका-यांच्या पाहणीतून दिसून आले होते. गेल्या दहा दिवसांपासून या भागांत वनाधिका-यांनी सतत टेहाळणी सुरु ठेवली होती. पोलिसांच्या मदतीने कारवाई कधीही सुरु केली जाईल, असे संकेत दिले जात होते. या झोपडपट्ट्यांतून मोठ्या प्रमाणात सांडपाणीही समुद्रात सोडले जायचे. परिणामी, लगतच्या वर्सोवा समुद्रातीत पाण्याचा रंगही गढूळ झाला होता. या समुद्राच्या पाण्यातून दुर्गंधीही खूप येत होती.

( हेही वाचा: काजूबोंडे, मोहाच्या दारूला सरकारने दिला विदेश मद्याचा दर्जा )

वर्सोवा येथील खारफुटींवर उभारलेल्या ५१ झोपड्या तोडून कांदळवनाची जागा साफ करण्यात आली आहे. ही कारवाई वनविभागाने पोलीस आणि महसूल विभागाच्या मदतीने केली- आदर्श रेड्डी, विभागीय वनाधिकारी, कांदळवन कक्ष, वनविभाग

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.