महान संगीतकार Gopi Sundar

Gopi Sundar : गोपी सुंदर हे आपल्या आईसोबत रेडिओवरचे गाण्यांचे कार्यक्रम ऐकायचे. तेव्हापासूनच त्यांना संगीतात रुची निर्माण झाली.

116
महान संगीतकार Gopi Sundar
महान संगीतकार Gopi Sundar

गोपी सुंदर (Gopi Sundar) यांचा जन्म ३० मे १९७७ साली कोची येथे झाला. त्यांचे वडील सुरेशबाबू हे प्रसिद्ध संगीतकार होते. त्यांच्या आईचं नाव लिवी असं होतं. लहानपणी गोपी सुंदर (Gopi Sundar) हे आपल्या आईसोबत रेडिओवरचे गाण्यांचे कार्यक्रम ऐकायचे. तेव्हापासूनच त्यांना संगीतात रुची निर्माण झाली. थोडे मोठे झाल्यावर ते आपल्या वडिलांच्या रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये मदत करायला लागले. शाळेत गेल्यावरही त्यांना अभ्यास करण्यापेक्षा तबला आणि की-बोर्ड वाजवायला जास्त आवडायचं. त्यांचं मन कायम संगीतातच रमायचं. (Gopi Sundar)

(हेही वाचा- Bhavesh Bhinde : भिंडेच्या पोलीस कोठडीत एक दिवसाची वाढ, भिंडेचे मासिक उत्पन्न कोटींच्या घरात)

शाळेतून बाहेर पडल्यानंतर गोपी सुंदर (Gopi Sundar) हे आपलं स्वप्न साकार करण्यासाठी, संगीत क्षेत्रात करिअर करण्यासाठी चेन्नईला गेले. त्यांच्या पालकांचं त्यांना पूर्ण समर्थन होतं. चेन्नईला जाऊन ते गव्हरमेंट म्युझिक कॉलेज मध्ये संगीत शिकवू लागले. पण त्य कामात त्यांना समाधान मिळत नव्हतं. (Gopi Sundar)

गोपी सुंदर (Gopi Sundar) यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला अनेक टीव्ही सिरियल्स आणि जाहिरातींसाठी संगीत कंपोज करण्यापासून केली होती. त्यांनी जवळजवळ पाच हजार इतके जिंगल्स लिहिले आहेत. एक की-बोर्ड प्लेअर म्हणून त्यांनी विशाल-शेखर यांसारख्या अनेक प्रसिद्ध संगीत दिग्दर्शकांसोबत काम केलं आहे. गोपी सुंदर (Gopi Sundar) यांनी त्यांच्या साऊंड ट्रॅक, अल्बम आणि चित्रपट संगीतासाठी कितीतरी पुरस्कार मिळवलेले आहेत. त्यांपैकी एक ‘राष्ट्रीय पुरस्कार’, एक ‘केरळ राज्य चित्रपट पुरस्कार’ आणि दोन दक्षिण भारतातले ‘फिल्मफेअर पुरस्कार’ सामील आहेत. (Gopi Sundar)

(हेही वाचा- Jagannath Chandan Yatra: पुरीमध्ये भगवान जगन्नाथ चंदन यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना; १५ भाविक होरपळले!)

गोपी सुंदर (Gopi Sundar) यांनी नवीन संगीतकारांना प्रोत्साहन देण्यासाठी कमी बजेटचे प्रोजेक्ट रेकॉर्ड करणे शक्य व्हावे म्हणून २०१४ साली ‘गोपी सुंदर म्युझिक कंपनी’ (Gopi Sundar Music Company) सुरू केली. त्यानंतर २०१६ साली त्यांनी दुबई येथे लाईव्ह परफॉमन्स करणारा स्वतःचा बँड सुरू केला. ‘बँड बिग जी’ असं त्या बँडचं नाव आहे. (Gopi Sundar)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.