Fatepur : अकबराच्या शाही शहराचे पहिले नाव ‘फतेहपुर’; चला जाणून घेऊयात रंजक गोष्टी

आजच्या लेखात घेऊयात अनेक लहान आणि विविध स्मारके आणि किल्ले बांधले गेलेल्या फतेपूरची माहिती

99
Fatepur : अकबराच्या शाही शहराचे पहिले नाव ‘फतेहपुर’; चला जाणून घेऊयात रंजक गोष्टी

तुम्ही आग्राला (Agra) भेट दिली असेल, परंतु कदाचित तुम्हाला फतेहपूर सिक्रीबद्दलच्या या मनोरंजक गोष्टी माहित नसतील. आज या लेखात आम्ही तुम्हाला फतेहपूर सिक्रीशी संबंधित काही रंजक गोष्टी सांगणार आहोत. आग्रा जवळ फतेहपूर सिक्री हे १६ व्या शतकात बांधले गेले. त्याकाळी हे शहर बऱ्यापैकी राजेशाही थाटाचे असायचे. पण आजही या शहरामध्ये मुघल साम्राज्याचा वारसा आहे. हे मुघल सम्राट (Mughal Samarat) अकबर याने १५७१ मध्ये बांधले होते. १२ व्या शतकात शुंग राजवंश आणि नंतर राजपूतांच्या काळात येथे अनेक लहान आणि विविध स्मारके आणि किल्ले बांधले गेले. फतेहपूर सिक्री बांधताना अकबराने ते पाडले होते, असे मानले जाते. १५८६ मध्ये शहरात पाण्याच्या कमतरतेमुळे राजधानी फतेहपूर सिक्री येथून दिल्लीला हस्तांतरित करण्यात आली. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणाविषयी काही रंजक गोष्टी सांगणार आहोत. (Fatepur)

(हेही वाचा – Rajendra Gavit : पालघरची जागा भाजपा लढवणार; विद्यमान खासदार गावित शिवसेनेतून भाजपात प्रवेश करणार ) 

फतेपूर सिक्रीचा नावाचा नेमका अर्थ काय ?

फतेहपूर सिक्री हे नाव अरबी भाषेतून आले आहे, फतेह म्हणजे ‘विजय’ आणि सिक्री म्हणजे ‘देवाचे आभार मानणे’. या शहराचे जुने नाव फतेहाबाद असे होते, जे सम्राट अकबराने दिले होते, या नावाचा अर्थ ‘विजयाचे शहर’ असा होतो. जहांगीरच्या दुसऱ्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी फतेहाबाद आणि सिक्रीपुरीचा समावेश असलेल्या शाही राजवाड्याचे बांधकाम सुरू केले. अशा प्रकारे फतेहाबादचे बदलून फतेहपूर सिक्री करण्यात आले. (Fatepur)

(हेही वाचा – IPL 2024 Virat Kohli : ऑरेंज कॅप नावावर असूनही विराट कोहलीवर या हंगामात टीका का होतेय?)

हा आहे जगातील सर्वात उंच प्रवेशद्वार

बुलंद दरवाजा हा फतेपूर सिक्री वास्तुकलेचे वैशिष्ट्य आहे, ५४ मीटर उंच असलेला हा दरवाजा जगातील सर्वांत उंच प्रवेशद्वार (The highest entrance) आहे. भिंतीवर कुराणातील (Quran) काही श्लोकही कोरलेले आहेत. आतील भागातील अनोखे नमुने आणि कारागिरी येथे दिसून येते. ज्यामुळे ही रचना पहाणाऱ्याच्या नजरेत खूप खास बनते.  (Fatepur)

युनेस्कोने सुद्धा घेतली याची दखल

फतेहपूर सिक्रीचा शाही राजवाडा संकुल आता युनेस्को हेरिटेज साइट (UNESCO Heritage Site) म्हणून समाविष्ट आहे. येथे आपण ऐतिहासिक मंदिरे आणि स्मारके पाहू शकता. यात भारतातील सर्वात मोठ्या आणि प्रसिद्ध मशिदींपैकी एक असलेल्या जामा मशिदीचाही (Jama Masjid) समावेश आहे. या ठिकाणी दररोज हजारो पर्यटक भेट देण्यासाठी येत असतात. (Fatepur)

( हेही वाचा – Mahavikas Aghadi : ‘मविआ’ उमेदवारांनी केला आचारसंहिता भंग असे काँग्रेस नेते वडेट्टीवार का म्हणाले? ) 

चक्क येथे ड्रम वापरले होते ?

प्रवेशद्वाराजवळ नौबत खाना नावाचे ढोलकघर आहे, जिथे पाहुण्यांच्या आगमनाची घोषणा केली जात होती. या इमारतीला मुघल संस्कृतीतील नौबत ड्रमचे नाव देण्यात आले आहे. हे विशेष समारंभात वाजवले गेले. हे ढोल इमारतीच्या आत वाजवले जात होते, ज्याची रचना मुघल कलेच्या गुंतागुंतीच्या कोरीव कामांनी पर्यटकांना पाहण्यास मिळते. (Fatepur)

हे पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.