Viral Video : विमान उंच आकाशात असताना अचानक दरवाजा उघडला आणि…

248
Viral Video : विमान उंच आकाशात असताना अचानक दरवाजा उघडला आणि...
Viral Video : विमान उंच आकाशात असताना अचानक दरवाजा उघडला आणि...

जर तुम्ही विमानाने प्रवास करत असाल आणि विमान उंच आकाशात असताना अचानक त्याचा दरवाजा उघडला तर तुम्हाला काय वाटेल? हे वाचून सर्वात आधी एक भीतीची लहर संपूर्ण शरीरात धावून जाते ना? पण ज्या लोकांनी हा अनुभव घेतला आहे त्यांची काय अवस्था झाली असेल याचा अंदाज आपण लावू शकत नाही.

ही घटना खरोखरच घडली असून सध्या या घटनेचा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर युजर्सच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील येत आहेत. ब्रेकिंग एव्हीशन न्यूज अँड व्हिडीओ नावाच्या एका ट्विटर अकाउंटने आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, एक विमान उंच आकाशात भरारी घेत आहे आणि अचानक या विमानाचा कार्गो डोअर उघडला आहे.

पाहा हा थरारक व्हिडिओ:

(हेही वाचा – Police : पोलीस ठाण्याची बँक खाती असुरक्षित; बँक खात्यावर ३२ लाखांचा दरोडा)

या विमानाच्या दरवाज्यातुन बाहेरचे अतिशय विहंगम दृश्य दिसत आहे. बाहेर ढग हवेत तरंगताना दिसत आहेत. तसेच खाली हिरवळ पसरलेली दिसत आहे आणि जोराने वाहणारे वाऱ्याचे झोत विमानातून आत बाहेर करत आहेत. त्यांचा आवाज आपण स्पष्टपणे या व्हिडिओमध्ये ऐकू शकतो. हे दृश्य नयनरम्य दिसत असले तरीही बरेच धोकादायक आहे. पण सुदैवाने विमानातील लोकांना कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही आणि ते विमान सुखरूपपणे जमिनीवर उतरले.

या व्हिडिओ पोस्टच्या कॅपशनमध्ये लिहिले आहे की, ‘ब्राझीलचे गायक आणि गीतकार टीएरी यांच्या हवाई सफरी दरम्यान विमानाचा कार्गो दरवाजा उघडल्यानंतर विमान साओ ल्युईस विमानतळावर सुरक्षितपणे उतरविण्यात आले. या व्हिडिओला आतापर्यंत एक लाख सेहेचाळीस हजार व्ह्यूज मिळाले आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.