Tata Punch EV : टाटाच्या ‘या’ नवीन ईव्हीची किंमत किती असेल, बॅटरी क्षमता काय आहे?

टाटा कंपनीच्या पुढील वर्षी लाँच होणाऱ्या या नवीन ई-वाहनाबद्दल जाणून घेऊया…गाडीची संभाव्य किंमत, बॅटरी क्षमता आणि इतर फिचर्स.

175
Tata Punch EV : टाटाच्या ‘या’ नवीन ईव्हीची किंमत किती असेल, बॅटरी क्षमता काय आहे?
Tata Punch EV : टाटाच्या ‘या’ नवीन ईव्हीची किंमत किती असेल, बॅटरी क्षमता काय आहे?
  • ऋजुता लुकतुके

टाटा कंपनीच्या पुढील वर्षी लाँच होणाऱ्या या नवीन ई-वाहनाबद्दल जाणून घेऊया…गाडीची संभाव्य किंमत, बॅटरी क्षमता आणि इतर फिचर्स. (Tata Punch EV)

टाटा मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या मिळून तीन नवीन ईव्ही गाड्या येत्या वर्षांत सुरुवातीलाच लाँच होणार आहेत. टाटा मोटर्स ही कंपनी देशातील आघाडीची इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी आहे. आपली मायक्रो एसयुव्ही प्रकारातील टाटा पंच ही गाडी कंपनी इलेक्ट्रिक प्रकारात लाँच करत आहे. (Tata Punch EV)

या गाडीचं टेस्टिंग मोठ्या प्रमाणावर सध्या सुरू आहे. आणि तुम्ही शहरातील रस्त्यांवर कदाचित एखादं टेस्ट ड्राईव्ह पाहिलंही असेल. आणखी सहा महिन्यांच्या आत ही कार लाँच होईल असा जाणकारांचा अंदाज आहे. (Tata Punch EV)

टाटा पंच ईव्हीची संभाव्य किंमत

टाटा कंपनीसाठी ही गाडी टियागो आणि टिगॉर या दोन गाड्यांच्या मधली आहे. त्यामुळे हॅचबॅक कार असलेली टियागो ईव्ही आणि सेडान प्रकारातील टिगॉर ईव्ही यांच्यामध्ये टाटा पंच ईव्हीची किंमत असू शकते. एक्स शोरुम ही गाडी तुम्हाला १० लाखांपासून मिळू शकेल असा अंदाज आहे. ईव्ही गाडीची किंमत ही बहुतांशी गाडीतील बॅटरीवर अवलंबून असते. त्यामुळे बॅटरीची निश्चित किंमत कळली की, गाडीच्या किमतीचा अंदाज बांधता येऊ शकतो. (Tata Punch EV)

(हेही वाचा – Ravindra Chavan : ठाणे व कल्याणमधील ग्रामीण रस्त्यांना आता प्रमुख जिल्हा मार्गाची दर्जोन्नती; रविंद्र चव्हाण यांचा निर्णय)

ईव्ही गाड्यांमधील सर्वोत्तम रेंज

टाटा मोटर्स कंपनी ईव्ही तंत्रज्जानात अद्ययावत बदल करणारी कंपनी मानली जाते. आताही टाटा पंच गाडीतील बॅटरीमध्ये झिपट्रॉन तंत्रज्जान असेल. आणि या बॅटरीची रेंज २५० ते ३५० किमी पर्यंत असू शकते. तसंच गाडी १२९ पीएस पर्यंतची ऊर्जा निर्माण करू शकेल असंही बोललं जात आहे. (Tata Punch EV)

बाकी गाडीचं इंटिरिअर हे नियमित टाटा पंच गाडीसारखंच असेल. पण, ईव्ही गाडीला कीलेस एंट्री, ऑटो क्लायमेट कंट्रोल आणि वायरलेस फोन चार्जरसारख्या अतिरिक्त सुविधा मिळू शकतात. या गाडीला पार्किंगसाठी मागच्या बाजूला कॅमेराही असेल. (Tata Punch EV)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.