Sydney Terror Attack: सिडनीतील मॉलवर दहशतवादी हल्ला, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; नेमकं काय घडलं?

न्यू साऊथ वेल्स पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोंडी जंक्शनवर हा हल्ला झालाय. दुकानदारांना लक्ष्य करण्याचा हल्लेखोरांचा उद्देश होता, असं सिडनी पोलिसांच मत आहे.

198
Sydney Terror Attack: सिडनीतील मॉलवर दहशतवादी हल्ला, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; नेमकं काय घडलं?

ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये दहशतवादी हल्ला झाल्याचे वृत्त आहे. सिडनीतील एका मॉलवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या दहशतवादी हल्ल्यात अनेक जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती ऑस्ट्रेलियन माध्यमाकडून समोर आली आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर घटनास्थळी प्रचंड खळबळ उडाली. जीव वाचवण्यासाठी लोक सैरावैर सर्वत्र धावू लागले. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून मॉलमध्ये अडकलेल्या हजारो लोकांना बाहेर काढण्यात आले आहे, तर काही जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

न्यू साऊथ वेल्स राज्याच्या पोलिसांनी संपूर्ण मॉलला घेराव टाकलाय. सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल झाले आहेत. यात जमाव मॉल बाहेर पळताना दिसतोय. पोलिसांच्या गाड्या आणि इमर्जन्सी सेवा त्या क्षेत्रामध्ये दिसतायत. मिळालेल्या माहितीनुसार, दोन हल्लेखोर होते. त्यात एकाला मारण्यात आलय. दुसऱ्याचा शोध सुरू आहे. यामध्ये अनेकांचा चाकू हल्ला करून आणि गोळीबारात मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सिडनीच्या बोंडी जंक्शन येथे अनेकांवर वेस्टफिल्डमध्ये मोठ्या प्रमाणात चाकूने वार केल्याने चार लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे आणि तर अनेक जण जखमी झाले आहेत.

सीसीटीव्ही फुटेज
न्यू साऊथ वेल्स पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोंडी जंक्शनवर हा हल्ला झालाय. दुकानदारांना लक्ष्य करण्याचा हल्लेखोरांचा उद्देश होता, असं सिडनी पोलिसांच मत आहे. लोकांना सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शॉपिंग सेंटरमध्ये गोळीबाराचा आवाज ऐकल्याचं स्थानिक लोकांच म्हणणं आहे. त्यानंतर लोकांना तिथून पळताना पाहिलं तसेच ही घटना प्रत्यक्ष पाहिलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, त्यांनी लेव्हल ४वर जेडी स्पोर्टस स्टोअरसमोर २ तरुणांचे मृतदेह पाहिले, याचे काही सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहेत. त्यामध्ये अनेक लोकं जखमी झाल्याचे दिसत आहे.

मॉल कॅम्पसमध्ये आपत्कालीन सेवा पूर्ववत
पोलिसांनी संपूर्ण मॉलला घेराव घातला आहे. सोशल मीडियावरील अनेक पोस्ट्समध्ये मॉल आणि पोलिसांच्या वाहनांमधून आणि आपत्कालीन सेवांमधून लोक पळत असल्याचे दिसून आले आहे, मिळालेल्या माहितीनुसार, दोन हल्लेखोर होते, त्यापैकी एक ठार झाला आहे. तर दुसऱ्याचा शोध सुरू आहे तसेच चाकू हल्ल्यात ६ जण ठार झाले असून संशयिताने एकट्यानेच हे कृत्य केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मॉल कॅम्पसमध्ये आपत्कालीन सेवा पूर्ववत करण्यात आल्या आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.