राष्ट्र निष्ठेचा सन्मान; स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या सदस्यांची बिनविरोध निवड 

119

वीर सावरकरांवर टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देण्याचे काम स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कार्यकारिणीने केले आहे. सावरकरप्रेमींचा विश्वास संपादन केलेल्या या कार्यकारिणीवर स्मारकाच्या सभासदांनी तितकाच विश्वास ठेवल्याने यावेळी निवडणुकीत स्मारकाच्या सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक अधिकारी संजय जोशी यांनी २३ डिसेंबर रोजी ही घोषणा केली.

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या स्थापनेपासून विविध मान्यवरांनी याचे नेतृत्व केले आहे. वीर सावरकर यांचे कार्य संपूर्ण जगात पोहचवण्यासोबतच त्यांच्या राष्ट्रनिष्ठेच्या विचारांचा प्रसार करण्याचे काम स्मारकाकडून केले जाते. गेली १८ वर्षे वीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर हे स्मारकाचे कार्याध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. कालांतराने त्यांच्यासोबत अन्य काही सदस्य सहभागी झाले आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक हे सशक्त विचार, हिंदूत्वाच्या कार्याचे एक शक्तिशाली केंद्र बनले. स्मारकाच्या कार्यकारिणीचा कार्यकाळ यावर्षी संपला. यामुळे निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली. ज्यात पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड झाली आहे.

(हेही वाचा गांधी हत्येचे धागेदोरे काँग्रेसपर्यंत पोहचतात! रणजित सावरकरांचा ‘एबीपी माझा कट्ट्या’वरून खळबळजनक आरोप)

या निवडणूक प्रक्रियेत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या काही विद्यमान आणि नवीन सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. या बिनविरोध निवडीमध्ये माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित हे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष म्हणून दुसऱ्यांदा निवडले गेले आहेत.

कार्यकारिणी सदस्य (आश्रयदाता विभाग) 

  • स्वप्नील सावरकर
  • के. सरस्वती
  • विज्ञानेश शंकर मासावकर
  • अभय जोशी
  • कमलाकर गुरव

कार्यकारी सदस्य (सामान्य विभाग)

  • चंद्रशेखर साने (पुणे)
  • दीपक कानुलकर
  • डॉ.अमित नाबर
  • चिरायू पंडित (वडोदरा)
  • भाग्यश्री सावरकर (पुणे)

(हेही वाचा प्रभू रामचंद्रांना राष्ट्रपिता मानत नसाल तर गांधींना का? रणजित सावरकर यांचा एबीपी न्यूजच्या कार्यक्रमात परखड सवाल)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.