स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि राष्ट्रभक्ती समितीतर्फे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा

71

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि राष्ट्रभक्ती समिती आयोजित स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात स्वातंत्र्यदिन सोहळा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी भारतीय वायू सेनेचे ग्रुप कॅप्टन निलेश देखणे, चित्रपट लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, अभिनेते तुषार दळवी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

क्रांतिकारक आणि जवानांच्या कथा मुलांना सांगाव्यात- निलेश देखणे

यावेळी ग्रुप कॅप्टन निलेश देखणे यांनी स्वातंत्र्य सैनिकांसोबतच देशाच्या रक्षणासाठी सीमेवर लढणा-या वीर जवानांचा गौरव केला. तसेच पुढच्या पिढीला घडवण्यासाठी पालकांनी क्रांतिकारक, हुतात्मा झालेल्या जवानांच्या कथा आपल्या मुलांना सांगणे गरजेचे आहे. या सर्वांकडून मुलांना एक वेगळीच प्रेरणा मिळेल आणि राष्ट्रभक्तीचे बीज कोवळ्या वयातच त्यांच्या मनात रुजेल, असे निलेश देखणे यावेळी म्हणाले.

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितलेले तिरंग्याचे महत्व

अभिनेते तुषार दळवी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितलेले तिरंग्याचे महत्व सादर केले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तिरंग्याला विरोध केल्याच्या वावड्या उठवण्यात येतात, त्याला छेद देणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या लेखणीतून अवतरलेले हे तिरंग्याचे महत्व तिरंग्यातील तीन रंगाचे प्रत्येक अंग उलगडून सांगतो.

‘इन्कलाब’ कादंबरीतील प्रसंग

अभिनेते,दिगदर्शक दिग्पाल लांजेकर यांनी लेखिका मृणालिनी जोशी यांच्या इन्कलाब या भगतसिंग यांच्या चरित्रातील एक प्रसंग सादर केला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या भगतसिंग यांच्या आई आणि बहीण अमृत कुंवर यांच्या त्यागाची अतिशय हृदयस्पर्शी अशी कथा दिग्पाल लांजेकर यांनी प्रकट केला.

महाराष्ट्र मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिके

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक संचालित कलांगणच्या गायक कलाकारांनी उत्तम अशी देशभक्तीपर गीते सादर केली. नृत्यांगना पूर्वी भावे, दिशा देसाई यांनी नृत्याविष्कार सादर केले. तसेच मुरबाड येथील महाराष्ट्र मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध साहसी प्रात्यक्षिके सादर करत प्रेक्षकांची वाहवा मिळवली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.