Monsoon Session 2022: मंत्रालयासमोर पेटवून घेतलेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

106

पावसाळी अधिवेशनादरम्यान, मंत्रालयासमोर एका शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. यावेळी जखमी अवस्थेत या शेतकऱ्याला त्वरीत रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र आज, सोमवारी त्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

(हेही वाचा – रिलायन्स Jio चा स्वस्तातील 5G फोन लवकरच लॉन्च होणार, काय आहेत फीचर्स?)

मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रालयासमोर जाळून घेतलेल्या शेतकऱ्याचा सोमवारी जे.जे रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. रुग्ण 45% भाजल्याने सकाळी 11 वाजून 45 मिनिटांनी 56 वर्षीय शेतकऱ्याला मृत घोषित करण्यात आले. आठवड्याभरापासून त्यांच्यावर जे.जे रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. गावाकडे जमीन हडपल्याच्या वादातून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता, असेही सांगितले जात आहे.

मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव सुभाष भानुदास देशमुख असे आहे. ते उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील तांदूळवाडी या गावात राहण्यास होते. 23 ऑगस्ट रोजी दुपारी मंत्रालयासमोर अंगावर पेट्रोल टाकून देशमुख यांनी पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेच्या वेळी तैनात असलेल्या पोलिसांनी धाव घेतली आणि त्या शेतकऱ्याच्या हातून पेट्रोलची बाटली हिसकावून घेतली. या घटनेत देशमुख गंभीर जखमी झाले होते. मात्र आज अखेर त्यांचा मृत्यू झाला आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.