IPS Rashmi Shukla : पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांच्या नावावर शिक्कामोर्तब

193
IPS Rashmi Shukla : पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांच्या नावावर शिक्कामोर्तब
IPS Rashmi Shukla : पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांच्या नावावर शिक्कामोर्तब

महाराष्ट्र पोलीस दलात मोठे बदल करण्यात आले आहेत. राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष करण्यात आले आहे. तसेच कथित फोन टॅपिंग प्रकरणामुळे वादात भोवऱ्यात अडकलेल्या जेष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची रजनीश सेठ यांच्या जागी पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. १९८८ बॅचच्या आयपीएस अधिकारी असणाऱ्या रश्मी शुक्ला या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक आहे. (IPS Rashmi Shukla)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर बुधवारी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जागी नवा अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. १९८८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आणि राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी या पदासाठी अर्ज केला होता. त्यांच्यासह एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, निवृत्त अधिकारी प्रदीपकुमार यांनी अर्ज केले होते. मात्र, निवड समितीचे प्रमुख मनोज सौनिक यांनी रजनीश सेठ यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष पदावर निवड केली. बुधवारी उशिरा रजनीश सेठ यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. (IPS Rashmi Shukla)

(हेही वाचा – Cyber Crime : कंत्राटदाराकडून सरकारी कार्यालयांना अधिकाऱ्याच्या बदल्यांचे मेल, उपमुख्यमंत्र्यांचे बनावट लेटरहेड आणि स्वाक्षरीने केला मेल एकाला अटक)

रजनीश सेठ यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्षपदी निवड करण्यात आल्यानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या पोलीस महासंचालक पदावर जेष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची निवड करण्यात आली आहे. रश्मी शुक्ला या देखील १९८८ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. शुक्ला या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणून पदभार स्वीकारणार आहे. सध्या त्या प्रतिनियुक्तीवर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या प्रमुख आहेत. महाविकास आघाडी सरकारने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान कथित फोन टॅपिंग प्रकरणात त्यांची चौकशी सुरू केली होती. (IPS Rashmi Shukla)

तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही विधानसभेत एकनाथ खडसे, संजय राऊत, नाना पटोले, आशिष देशमुख आणि बच्चू कडू यांचे फोन टॅप झाल्याचा आरोप शुक्ला यांच्यावर केला होता. राज्यात सरकार बदलल्यानंतर फोन टॅपिंग प्रकरणातील त्यांच्या विरोधातील तपास बंद करण्यात आला होता, कथित फोन टॅपिंग प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने रश्मी शुक्ला विरोधातील याचिका फेटाळली होती. महाविकास आघाडी काळात शुक्ला यांच्यावर पुणे आणि मुंबईतील कुलाबा येथे गुन्हे दाखल करण्यात आले होते. परंतु पुराव्या अभावी न्यायालयाने दोन्ही गुन्हे रद्द केले आहे. (IPS Rashmi Shukla)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.